Prabodhini Ekadashi 2022: आजच्या एकादशीपासून २१ दिवस व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि इच्छापूर्तीचा अनुभव घ्या;नियम जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:35 PM2022-11-04T12:35:14+5:302022-11-04T12:35:35+5:30

Prabodhini Ekadashi 2022:आज कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर दिलेले नियम पाळून या स्तोत्राचे पठण करावे आणि मनोकामना पूर्तीचा अनुभव घ्यावा!

Prabodhini Ekadashi 2022: Start chanting Venkatesh Stotra for 21 days from today's Ekadashi and experience wish fulfillment; learn the rules! | Prabodhini Ekadashi 2022: आजच्या एकादशीपासून २१ दिवस व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि इच्छापूर्तीचा अनुभव घ्या;नियम जाणून घ्या!

Prabodhini Ekadashi 2022: आजच्या एकादशीपासून २१ दिवस व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि इच्छापूर्तीचा अनुभव घ्या;नियम जाणून घ्या!

googlenewsNext

व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देव दर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. त्यासाठीच या स्तोत्राची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे-

१) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे.

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावे.  

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या, जसे की, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य!

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावे. 

५)  इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे. 

७ ) २१ दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. 

 श्री व्यंकटेश स्तोत्र

व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः।
संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥
जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।
सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥
गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।
वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥
श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।
श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥
रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।
चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥
श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।
श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥
भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः 
अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥
सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।
समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥
इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।
त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥
राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।
भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥
अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । 
रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥
यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।
ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥
विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।
सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥
मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।
स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥
कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।
श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

Web Title: Prabodhini Ekadashi 2022: Start chanting Venkatesh Stotra for 21 days from today's Ekadashi and experience wish fulfillment; learn the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.