पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी सांगत आहेत प्रल्हाद वामराव पै live चर्चासत्रात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:00 AM2021-03-17T08:00:00+5:302021-03-17T08:00:03+5:30
आयुष्याचा समतोल राखण्यासाठी पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन करणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै!
मनुष्य धड पडेपर्यंत धडपड करतो, ते पैसा मिळवण्यासाठी! परंतु पैसे कमवता कमवता आयुष्य खर्च होतं आणि पुण्य कमवायचं राहूनच गेलं, हे लक्षात येतं. अशा वेळी पश्चात्तापाशिवाय काहीच मार्ग उरत नाही. कारण हातून निसटून गेलेले सोन्यासारखे क्षण, आयुष्य परत येत नाही. म्हणून आयुष्याचा समतोल राखण्यासाठी पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन करणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उर्मिला निंबाळकर. १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर हा मार्मिक संवाद आपल्याला ऐकता येणार आहे.
श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.
अशाच जीवन विद्येचे आपणही रस ग्रहण करूया आणि उद्याच्या चर्चा सत्रात सहभागी होऊया.