Lokmat Bhakti: 'लॉकडाऊन अन् कौटुंबिक स्वास्थ्य'; आज प्रल्हाद वामनराव पै करणार मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 10:30 AM2020-06-25T10:30:27+5:302020-06-25T10:37:10+5:30
जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै सध्याच्या परिस्थितीतील ताण तणाव कसे दूर करायचे यावर मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोनातील लॉकडाऊन कंटाळवाणा की सुवर्णसंधी? जवळ आलेलं कुटुंब दुरावा संपवणारं की भांडणं, मतभेद वाढवणारं? नातेसंबंधांचं मेकिंग आणि ब्रेकिंग कशावर नेमकं कशावर अवलंबून?, असे अनेक प्रश्न कोरोना संकटाच्या काळात अनेकांना पडले आहेत. या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै लोकमतच्या भक्ती या युट्युब चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत.
कोरोना महामारीच्या काळात देशातील नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला आहे. लॉकडाऊन काळात आपला काम-धंदा आणि नोकरी सोडून घरातच वेळ घालवावा लागला आहे. अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला आहे. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत कौटुंबिक आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकांना केला. मात्र, काहींना या लॉकडाऊन काळात मानिसक तणावाला सामोरे जावं लागलं आहे. या सगळ्याचा सामना नेमका कसा करायचा, याबद्दलचं मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै करणार आहेत.
लॉकडाऊन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर प्रल्हाद वामनराव पै आज संध्याकाळी ८ वाजता मार्गदर्शन करतील. त्याचं थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनेलवरून पाहता येईल. लॉकडाऊनचा आपल्या मनावर झालेला परिणाम आणि लॉकडाउन काळातील मानसिक तणावातून कसं बाहेर यावं, यावरही चर्चापर मार्गदर्शन होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातील कौटुंबिक स्वास्थ्य जपताना, पुढील काळातही कुटुंबात एकत्रितपणे वावरताना कशी काळजी घ्यायची, यावरही चर्चा होईल.