Rahu In Mesh 2022: राहुचा मेष राशीत प्रवेश: भारतासाठी खडतर काळ, शेअर बाजारात घमासान, कोरोना वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:49 AM2022-03-04T09:49:52+5:302022-03-04T09:50:36+5:30

Rahu And Ketu Transit 2022: तब्बल १८ वर्षांनंतर राहु मेष, तर केतु तूळ राशीत प्रवेश करणार असून, याचा मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

rahu transit in mesh 2022 effects over india agriculture politics and share market of rahu in mesh and ketu in tula rashi | Rahu In Mesh 2022: राहुचा मेष राशीत प्रवेश: भारतासाठी खडतर काळ, शेअर बाजारात घमासान, कोरोना वाढणार?

Rahu In Mesh 2022: राहुचा मेष राशीत प्रवेश: भारतासाठी खडतर काळ, शेअर बाजारात घमासान, कोरोना वाढणार?

googlenewsNext

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. तब्बल १८ वर्षांनंतर राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषीयदृष्टीने ही घटना अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. सप्टेंबर २०२० मध्ये राहु मिथुन राशीतून वृषभ राशीत विराजमान झाला होता. आता यानंतर सुमारे दीड वर्षांनी राहु वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. राहुचा मेष राशीत होत असलेला प्रवेश आणि एकूण जागतिक परिस्थिती तसेच घडामोडी पाहता भारतासाठी आगामी काळ खडतर असून, अन्नधान्य, शेअर मार्केट, कोरोना संकट, शेती, हवामान, राजकारण यांसारख्या विविध क्षेत्रात मोठा प्रभाव आणि परिणाम दिसून येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. (rahu transit in mesh 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे दोन्ही छाया ग्रह मानले जातात. विशेष म्हणजे राहु आणि केतु एकमेकांपासून सप्तम स्थानी असतात आणि केवळ वक्री मार्गानेच एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करतात. राहु मेष राशीत प्रवेश करत असताना, केतु वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रह एकाच दिवशी आणि एकाच वेळी राशीबदल करणार आहेत. १७ मार्च २०२२ नंतर सुमारे १८ महिन्यांपर्यंत राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत विराजमान असतील. (ketu transit tula rashi 2022)

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम

राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत प्रवेश करतील. त्यावेळी मकर राशीत शनी, मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती असेल. भविष्यफल भास्करनुसार, राहु मेष राशीत प्रवेश करणे फारसे चांगले मानले जात नाही. अन्नधान्य, खाण्या-पिण्याच्या वस्तू यांचे दर गगनाला भिडू शकतात. याशिवाय, मेष राशीचा स्वामी असलेल्या मंगळची मकर राशीतून चौथी दृष्टी राहुवर असेल. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उपभोक्ता वस्तू महाग होऊ शकतात. जनतेला पुन्हा एकदा महागाईच्या झळा बसू शकता, असे सांगितले जात आहे. तसेच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गहू तसेच अन्य अन्नधान्याच्या साठ्यात कमतरता होऊन किमती वाढू शकतात, असे म्हटले जात आहे. 

अवकाळी पाऊसासह शेअर मार्केटवर परिणाम

एकूण ग्रहस्थिती आणि बदलांचा परिणाम हवामानावर झालेला पाहायला मिळू शकतो. मार्च महिन्यात भारताच्या काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. याचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. एप्रिल महिन्यात कुंभ राशीतील शनी-मंगळ युती आणि जून महिन्यातील राहु-मंगळाची युती याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊ शकतो. मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. एप्रिल आणि सप्टेंबर या कालावधीत सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राजकीय वातावरणात संघर्ष वाढू शकेल

स्वतंत्र भारताच्या कुंडलीनुसार, आताच्या घडीला चंद्राच्या महादशेत बुधची अंतर्दशा सुरू असून, मंगळ आणि राहुच्या स्थित्यंतरानंतर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात मोठी राजकीय क्षेत्रात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय कोरोनाचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते, अशी शक्यता असून, काही अप्रिय घटना घडू शकतात. तसेच राहुपासून सातव्या स्थानी असलेल्या केतुवर गुरुची दृष्टी पडत असल्याने जुलै महिन्याच्या आसपास नैसर्गिक आपत्ती देशावर ओढावू शकते, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: rahu transit in mesh 2022 effects over india agriculture politics and share market of rahu in mesh and ketu in tula rashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.