Raksha Bandhan 2022: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवसांत विभागून आल्याने रक्षाबंधन ११ की १२ ऑगस्टला? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:47 PM2022-07-12T17:47:30+5:302022-07-12T17:47:49+5:30
Rakshabandhan date & time: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवस विभागून आल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तो म्हणजे रक्षाबंधनाचा! हा संभ्रम दूर करण्यासाठी ही सविस्तर माहिती...
रक्षाबंधन-२०२२: रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा उत्सव राखी बांधून साजरा केला जातो. तसेच या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमादेखील साजरी केली जाते. मात्र यंदा ११ आणि १२ ऑगस्ट या दोन्ही दिवशी पौर्णिमा असल्याचे दिनदर्शिकेत दाखवत असल्यामुळे रक्षाबंधन नक्की कधी साजरे करायचे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. त्यासाठी तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे-
पंचांगानुसार, श्रावण महिन्यात पौर्णिमा ही तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३८ वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७. ०५ मिनिटांनी समाप्त होईल. पौर्णिमा तिथी ११ तारखेला पूर्ण दिवस आहे. याचा अर्थ रक्षाबंधनही ११ तारखेलाच साजरे करायचे आहे.
रक्षाबंधन २०२२ शुभ मुहूर्त
रक्षाबंधन तारीख - ११ ऑगस्ट २०२२, गुरुवार
पौर्णिमा प्रारंभ - ११ ऑगस्ट, सकाळी १०. ३८ पासून
पौर्णिमा समाप्ती - १२ ऑगस्ट. सकाळी ७. ०५ मिनिटांनी
शुभ मुहूर्त - ११ ऑगस्ट सकाळी ९. २८ ते रात्री ९. १४ पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी १२.६ ते १२. ५७ पर्यंत
अमृत काल- संध्याकाळी ६. ५५ ते ८. २० पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - सकाळी ४.२९ ते पहाटे ५. १७ पर्यंत
रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र कालावधीची समाप्ती - रात्री ८.५१ मिनिटांनी
वरील माहितीनुसार मनातील संभ्रम दूर करा आणि ११ तारखेला रक्षबंधनाच्या उत्सवाची तयारी सुरू करा!