Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:10 PM2022-08-10T22:10:40+5:302022-08-10T22:11:32+5:30
भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते.
हिंदू धर्मात रक्षाबंधन उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या उत्सवाच्या दिवशीच भद्रा काळ आला आहे. सामान्य मान्यतेनुसार, भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते.
भद्रा ही सूर्य देव आणि त्यांची पत्नी छाया यांची मुलगी आहे. याच बोरोबर ती शिनीदेवाची सख्खी बहिनही आहे. ज्या प्रकारे शनिदेवांचा स्वभाव कडक मानला जातो. त्याच प्रकारे त्यांची बहीण भद्रा हिचा स्वभावही कडक मानला जातो. पौराणिक कथेनुसार भद्रा ही अतिशय कुरूप असून, ती लहानपणापासूनच ऋषी-मुनींचे यज्ञ आणि अनुष्ठानांत अडथळे आणत होती.
यामुळे, अखेर सूर्य देवांनी चिंतित होऊन ब्रह्माजींकडे सल्ला मागीतला. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या उद्धटपणावर नियंत्रणात आणण्यासाठी पंचांगाचे एक मुख्य अंग असलेल्या विष्टी करणमध्ये तिला स्थान दिले. याच बरोबर, आता जे कुणी तुझ्या काळात काही शुभ काम करेल, त्यात तू विध्न आण, असे सांगितले. तेव्हापासूनच भद्रा काळात कुठल्याही प्रकारचे शुभ काम केले जात नाही.
भद्रा काळात राखीही बांधत नाहीत -
गृह प्रवेश, नव्या कामांना सुरुवात करणे, पूजा-अनुष्ठान आदींशिवाय भद्रा काळात राखीही बांधली जात नाही. पौराणिक कथेनुसार, रावणाच्या बहिणिने त्याला भद्रा काळातच राखी बांधली होती आणि यानंतर, एका वर्षाच्या आतच भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. यामुळे, भद्रा काळात राखीदेखील बांधली जात नाही, असे मानले जाते.
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्व सामान्य मान्यतांवर आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी कत नाही.)