Ram Navami 2022 : श्रीराम आपल्या आयुष्यातही यावेत म्हणून रामनवमीला करा 'ही' विशेष उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:41 PM2022-04-08T12:41:15+5:302022-04-08T12:41:42+5:30
Ram Navami 2022: रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला. यंदा रामनवमी १० एप्रिल, रविवारी साजरी होणार आहे. या दिवशी केलेले उपाय दुःख दूर करतात आणि जीवनात आनंद आणतात.
भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. यंदा रामनवमी १० एप्रिल, रविवारी साजरी होणार आहे. रामनवमीच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवन आनंदाने भरून जाऊ शकते.
राम नवमीच्या दिवशी करा हे उपाय
संकटांपासून दूर राहण्यासाठी उपाय: जर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाने घेरले असेल तर राम नवमीच्या दिवसापासून रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने सर्व प्रकारच्या त्रासापासून आराम मिळेल.
दु:खापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय : दु:खाच्या वेळी परमेश्वराची उपासना केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि संयम प्राप्त होतो. रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामाची आराधना केल्याने आणि 'श्री रामचंद्र कृपालु भज मन...' अशी रामाची स्तुती केल्याने दु:ख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते.
मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय: रामनवमीच्या दिवशी भगवान श्री रामाचे परम भक्त हनुमानजींची पूजा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात. म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसाचे संपूर्ण पठण करा, असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
सुख-समृद्धी मिळविण्याचे उपाय : रामाच्या नावात खूप शक्ती आहे. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची आराधना करून राम नामाचा जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
पुण्यप्राप्तीचा उपाय : रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पठण करणे हे पापांचा नाश करून पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.