Vasubaras 2024: धनागमन, धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य देणारे आजचे रमा एकादशी व्रत कसे करावे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:03 AM2024-10-28T10:03:17+5:302024-10-28T10:03:43+5:30
Rama Ekadashi 2024: आजपासून दिवाळी सुरु झाली. दिवाळी संपेपर्यंत सर्वांनी एक पथ्य आवर्जून पाळायचे आहे, कोणते? ते जाणून घ्या; लाभच होईल!
धनत्रयोदयशीपासून दिवाळी (Diwali 2024) सुरु झाली असे अनेकांना वाटते. त्यात काही जण तर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज यांनाच दिवाळीचे मुख्य सण मानतात. मात्र खरी दिवाळी सुरु झाली ती आजपासून अर्थात २८ ऑक्टोबर पासून. रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस (Vasu baras 2024) हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. पाठोपाठ २९ ला धनत्रयोदशी (Dhan Teras 2024), ३१ ला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024), १ नोव्हेंबर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024), २ ला पाडवा (Bali Pratipada 2024) आणि ३ ला भाऊबीज (Bhai Dooj 2024) असणार आहे. अनेक जण कोजागिरीपासून कंदील आणि रोषणाई सुरु करतात. ज्यांच्या घरी तसे केले जात नाही, त्यांनी निदान वसुबारसेपासून दिवाळी साजरी करायला हवी. या प्रत्येक सणाची माहिती आपण वेळोवेळी घेणारच आहोत. तूर्तास आज रमा एकादशी (Rama Ekadashi 2024)आणि वसुबारस याचे महत्त्व, उपासना आणि लाभ याबद्दल जाणून घेणार आहोत पालघरचे ज्योतिष अभ्यासक सचिन मधुकर परांजपे यांच्याकडून!
“दिपावली” ची सुरुवात आपण वसुबारसेपासून करतो. यावर्षी दिनांक २८ ऑक्टोबर सोमवारी रोजी एकादशी आणि वसुबारस एकत्र आले आहेत. या महिन्यात येणार्या (अश्विन) कृष्ण एकादशीला “रमा एकादशी” म्हणून संबोधतात. श्रीविष्णु आणि श्रीलक्ष्मीदेवी यांच्यातील अद्वैत किंवा तादात्म्यता दर्शविणारी ही एक महत्त्वाची एकादशी आहे हे व्रतस्थ साधकांनी आवर्जून लक्षात घेणे.
रमा एकादशी ही धनागमन, धनलाभ आणि आलेले पैसे स्थिर करणारी मानली जाते. दिवाळीत जे तांत्रिक धनसाधना करतात ते रमा एकादशीला खूप मानतात. “रमा एकादशी ते लक्ष्मीपूजन” हा काळ तांत्रिक लक्ष्मीसाधनेसाठी फार महत्वाचा असतो. एक तांत्रिक मला एकदा म्हणाला होता “भाई, रमा एकादस के दिन भगवान विष्णुजी के लिये कुछ उपवास तप करेंगे तो वोह घर आते है...फिर उनके पिछे पिछे काली चौदस को माता आवेगी”
तर ही एकादशी अजिबात चुकवू नका. सोमवार दिनांक २८ ते मंगळवार २९ दुपारी भोजनापर्यंत व्रतस्थ रहा. सोमवारी दोन्ही वेळ उपवास, विष्णुसहस्त्रनाम, विष्णुमंत्र जप करा...विशेषतः कर्जाचे टेन्शन असणारे, आर्थिक अडचणी असणाऱ्यांनी आवर्जून करा....
विशेष सूचना - २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर” दारुच्या थेंबालाही स्पर्श करु नका आणि कसलाही व्यभिचार करु नका!