Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:05 IST2025-03-18T07:00:00+5:302025-03-18T07:05:01+5:30

Rang Panchami 2025: इतर जोडप्यांचे रंगात रंगलेले फोटो पाहून वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला जोडीदार मिळावा म्हणून रंगपंचमीला दिलेले उपाय करा!

Rang Panchami 2025: Follow these remedies to get a partner of your choice by the next Rang Panchami! | Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

रंगपंचमी (रंगपंचमी 2025) हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो. रंगपंचमी हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी समस्त हिंदू रंग उधळून हा सण साजरा करतात आणि राधा कृष्णाच्या प्रेमाचे स्मरण करतात. त्यांच्यासारखे प्रेम आपल्यालाही आपल्या जोडीदाराच्या रूपात मिळावे यासाठी ज्योतिष शास्त्राने काही उपाय सांगितले आहेत ते आवर्जून करा. 

यंदा १९  मार्च २०२५ रोजी बुधवारी रंगपंचमीचा सण साजरा होत आहे. रंग खेळून, एकमेकांना पाण्याने भिजवून, पुरणपोळीचा आस्वाद घेत आपण हा सण साजरा करणारच आहोत, त्याबरोबरीने ज्योतिष शास्त्राने लग्न न झालेल्या तसेच लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांचे जीवन रंगीबेरंगी व्हावे या दृष्टीने काही उपाय दिले आहेत ते पाहूया. 

रंगपंचमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन किंवा घरी राधा कृष्णाची प्रतिमा असेल तर तिला लाल गुलाल आणि सौभाग्य लेणी अर्पण करा. असे मानले जाते की सौभाग्य लेणी अर्पण केल्याने आपल्यालाही लवकरच सौभाग्य प्राप्ती होते. 

याशिवाय रंगपंचमीच्या दिवशी भैरव देव, बजरंगबली आणि माता लक्ष्मीला लाल गुलाल अर्पण करा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने जीवनातील त्रासांपासून मुक्ती मिळते.

जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर यासाठी भगवान श्री राम, भगवान श्री कृष्ण आणि श्री हरीची पूजा करा आणि त्यांना गुलाल लावा. श्रद्धेनुसार असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

थोडक्यात काय तर इतरांशी रंगांनी खेळण्याआधी थेट देवाशी नाते जोडून भावपूर्ण स्थितीत देवालाही रंग लावा आणि त्याच्याशी भावनिक नाते जोडा. एकदा का हे नाते जोडले गेले, की आयुष्यात इतर कोणत्याही रंगाची उणीव भासणार नाही!

रंगपंचमी 202५ शुभ मुहूर्त

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी १८ मार्च रोजी रात्री १० :०९  मिनिटांनी सुरू झाली असून १९  मार्च रोजी रात्री १०: १३ मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत विवाहेच्छुक मंडळींनी वरील उपाय आज दिवसभरात कधीही केले तरी चालतील, पण हे उपाय सश्रद्धपणे केले तरच उपयोग होईल. मनात किंतु, परंतु ठेवू नये असे शास्त्र सांगते!

Web Title: Rang Panchami 2025: Follow these remedies to get a partner of your choice by the next Rang Panchami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.