Rathasaptami 2024: जमिनीचे वाद मिटवायचे असतील तर रथसप्तमीपूर्वी करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 02:42 PM2024-02-03T14:42:32+5:302024-02-03T14:42:59+5:30
Rathasaptami 2024: यंदा १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, सूर्यनारायणाच्या कृपेने आर्थिक वाद मिटवायचे असतील तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय करा.
जर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, तर दिलेले उपाय जरूर करून बघा. ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल त्यांनी रथसप्तमीच्या आधी तीळगुळाचे लाडू एखाद्या गरीब कुटुंबात दान करावेत. हे दान महत्त्वपूर्ण ठरते . हा उपाय केल्याने तुमचा संपत्तीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. याबाबतीत गोसेवादेखील उपयुक्त ठरू शकते.
गोसेवा करा
हिंदू धर्मात गायीची सेवा करणे शुभ मानले जाते. ज्यांना जमिनीशी संबंधित वाद मिटवायचे असतील त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायींची सेवा करा. प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर गोशाळेत आर्थिक दान द्या.
अन्न दान करा
दान करणाऱ्याला पुण्य प्राप्त होते, अशी सनातन धर्माची धारणा आहे. पापातून मुक्ती हवी असेल तरीही दानधर्म करण्याचा उपाय सांगितला जातो. दान केल्यामुळे अडलेली कामेदेखील मार्गी लागतात. तुमचाही जमिनीचा वाद सुरू असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा. शास्त्रांमध्ये असे मानले जाते की शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो. जमिनीच्या अडलेल्या व्यवहारांना गती येते.
देवीची कृपा
जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला जमीन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा. देवीची उपासना करताना तिचे स्तोत्रपठण तसेच तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी दानधर्म करावा. लक्ष्मीस्तोत्र म्हणावे किंवा श्रीसूक्त म्हणावे आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी देवीला सांगाव्यात. देवीची कृपा झाली तर अडलेली कामेही चुटकी सरशी मार्गी लागतील.