Rathasaptami 2024: यंदा कधी आहे रथ सप्तमी, जाणून घ्या पूजा विधी, मंत्र आणि शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:48 PM2024-02-01T12:48:45+5:302024-02-01T12:49:15+5:30

Rathasaptami 2024: हिंदू धर्मात रथसप्तमीच्या सणाचे विशेष महत्त्व आहे, पण हा सण नेमका कधी आहे आणि त्यादिवशी पुजा कशी केली जाते ते जाणून घ्या.

Rathasaptami 2024: When is Rathasaptami this year, Know Pooja Rituals, Mantras and Auspicious Timings! | Rathasaptami 2024: यंदा कधी आहे रथ सप्तमी, जाणून घ्या पूजा विधी, मंत्र आणि शुभ मुहूर्त!

Rathasaptami 2024: यंदा कधी आहे रथ सप्तमी, जाणून घ्या पूजा विधी, मंत्र आणि शुभ मुहूर्त!

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथ सप्तमी (Rath Saptami 2024)साजरी केली जाते. या दिवसाला सूर्य जयंती असेही म्हणतात. रथ सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

रथसप्तमी तिथी आणि तारीख : 

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी १५ फेब्रुवारीला सकाळी १०. १२ मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.५४ मिनिटांनी समाप्त होईल. मात्र उदयतिथी शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथ सप्तमी साजरी होणार आहे.

रथसप्तमी शुभ मुहूर्त : 

१६ फेब्रुवारीला रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ०५.१७ ते ०६.५९ पर्यंत आहे. या दिवशी सूर्योदयाची शुभ वेळ सकाळी ६.५९ आहे. या काळात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची एकूण शुभ वेळ १ तास ४२ मिनिटे आहे.

रथ सप्तमी ब्रह्म योग आणि भरणी नक्षत्रात आहे 

यंदा रथ सप्तमी ब्रह्मा आणि भरणी नक्षत्रात आहे. ब्रह्म मुहूर्त दुपारी ३:१८ मिनिटांपासून आहे, त्यानंतर इंद्र योग सुरू होईल. या दिवशी भरणी नक्षत्र सकाळपासून ०८.४७ मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे.

रथ सप्तमीचे महत्त्व जाणून घ्या 

धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरूढ होऊन जगाला प्रकाशमान करण्यास सुरुवात केली. या कारणास्तव, रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य (सूर्यदेव मंत्र) जयंती साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो.

रथ सप्तमीच्या दिवशी मंत्रांचा जप

रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या या मंत्रांचा जप करा. यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभते. 

  • ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः। ओम घृणि सूर्याय नमः। ओम भास्कराय नम:। ओम आदित्याय नम:।
  • ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः
  • ओम भास्कराय पुत्रं देहि महातेजसे।
  • धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात्।।
  • ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
  • ओम ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ओम

Web Title: Rathasaptami 2024: When is Rathasaptami this year, Know Pooja Rituals, Mantras and Auspicious Timings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.