शिंपल्यांचे शोपीस नको, गुण एकवटले मोत्यात; वाचा मोती वापरण्याचे अनंत फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 05:02 PM2021-09-02T17:02:48+5:302021-09-02T17:03:12+5:30
मोती हे रत्न अतिशय लाभदायक आहे आणि इतर रत्नाच्या तुलनेत स्वस्त असून ते गुणकारी देखील आहे.
मोती आवडत नाहीत अशी व्यक्ती सापडणे कठीण. त्याची गुलाबी आभा केवळ मोहिनी प्रदान करत नाही तर जीवनातील अनेक भयंकर समस्यांवर मात करण्याचे काम करते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील कोणताही अडथळा दूर करण्यासाठी मोती वापरण्याचा सल्ला ज्योतिषांकडून मिळतो. मोती हे असे रत्न आहे, ज्यात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. पुढीलपैकी तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावत असतील, तर मोत्याचा वापर करून पहा.
१. कौटुंबिक कलह आहे का?
जर तुमच्या जीवनात कौटुंबिक कलह कमी होत नसतील आणि त्यामुळे पती -पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी, पती किंवा पत्नीने मोत्याची अंगठी घाला. मोती वापरल्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. दोघांपैकी एकाने वादाच्या समयी माघार घेतली, तरी त्यामुळे घरातील कलह मिटतील आणि घरात शांती आणि समृद्धी नांदेल.
२. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत का?
जर तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले नसेल तर लहान मुलांना नेहमी आरोग्याच्या कुरबुरी जाणवत असतील, तर अशा परिस्थितीत मोती रामबाण औषध म्हणून काम करते. मुलांच्या गळ्यात चांदीच्या चैन मध्ये मोती घाला. हृदयाजवळ मोती राहिल्याने त्याच्या प्रभावामुळे आरोग्यात सुधारणा होत राहील.
३. निर्णय घेण्यास सक्षम नाही?
जीवनात कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत जर मनात गोंधळ निर्माण होत असेल तर ती निर्णयक्षमता वाढवण्यासाठी देखील मोती लाभदायक ठरेल. अशा स्थितीत, एखाद्या व्यक्तीने मोत्याची अंगठी किंवा गळ्यातील चैन मध्ये मोती घालावा. दररोज नियमितपणे गणपती स्तोत्राचे पठण करावे. तसे केल्याने खूप फायदा होईल आणि गोंधळाची परिस्थिती संपेल.
४. पैशांचा प्रश्न वारंवार उद्भवतो का?
जीवनात रोजगार असूनही, पैशाची कमतरता आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे एखादी व्यक्ती नेहमीच त्रस्त असते, मग अशा स्थितीत व्यक्तीने त्याच्या देवघरात १ मोती आणि तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून १ मोती ठेवावा. यामुळे लक्ष्मी जीवर अपार कृपा होईल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
५. चंचल मन, संतप्त स्वभाव आहे?
कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की मनात अस्वस्थता असते आणि स्वभावात राग असतो. जर तुम्ही स्वतः या सवयीने त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत मोती खूप फायदेशीर असतात. जर अशी परिस्थिती असेल तर पांढऱ्या कपड्यात बांधलेले सुंदर आणि स्वच्छ मणी तुमच्याकडे ठेवा. यामुळे मन अस्वस्थ होणार नाही आणि जो रागावर नियंत्रण राहील.
६. यशात अडथळे येतातेत?
जेव्हा, अथक प्रयत्न करूनही, एखादी व्यक्ती व्यावसायिक कारकीर्दीत जितकी मेहनत घेते तितकी प्रगती करू शकत नाही आणि करिअर थांबते, तेव्हा अशा स्थितीत, पांढऱ्या रेशमी रुमालात मोती ठेवा आणि तो रुमाल सदैव आपल्या बॅगमध्ये ठेवा. मार्गातले अडथळे दूर होऊन प्रगती होईल.
७. घरात सतत आजारपण असते?
बऱ्याच वेळा असे घडते की अनेकदा घरातील काही सदस्य आजारी असतात. विशेषत: जेव्हा स्त्रिया, वृद्ध किंवा मुले आजारी पडू लागतात, तेव्हा समस्या आणखी वाढते. अशा परिस्थितीत, पौर्णिमेच्या दिवशी, तांदळावर मोती ठेवा आणि तो मोती सत्पात्री दान करा, तुमच्या घरातून आजारपण निघून जाईल.