निसर्गातील 'या' २४ गुरुंकडून आपण काय शिकले पाहिजे, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:00 AM2021-05-20T08:00:00+5:302021-05-20T08:00:02+5:30

शिकण्याची वृत्ती ठेवली, तर नकारात्मक स्थिती, व्यक्ती आणि अनुभवातूनही बरेच काही शिकता येते. त्यासाठी दृष्टिकोन फक्त स्कारात्मक हवा.

Read what we should learn from these 24 'gurus' of nature! | निसर्गातील 'या' २४ गुरुंकडून आपण काय शिकले पाहिजे, ते वाचा!

निसर्गातील 'या' २४ गुरुंकडून आपण काय शिकले पाहिजे, ते वाचा!

googlenewsNext

सद्गुरुतत्त्व सदासर्वदा सगळीकडे एकाच वेळी उपलब्ध आहे. या ग्रंथिकेच्या रूपात ते स्वत:च उपदेश करत आहेत. त्यामुळे वाचक व वाचून साधनेला लागणारे साधक भाग्यवानच आहेत. पण असे असतानाही प्रत्यक्ष सद्गुरु भेटण्यापूर्वी निसर्गरूपी सद्गुरू प्रत्येकाला उपलब्ध आहे. दत्त गुरूंनीदेखील या चोवीस गुरूंकडून एक एक गुण घेतला. आपल्यालाही त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे ते पाहुया.

पृथ्वी : अपकार करणाऱ्यावरसुद्धा उपकार करणे.
वृक्ष: तुमच्यापाशी येणाऱ्याला काही ना काही द्या.
पर्वत : जगाला वाटण्यासाठी साठा करा.
वारा : एके ठिकाणी फार काळ आसक्त होऊ नका.
आकाश : शुद्धता, विचलित न होणारी शांतता धारण करा. विरोधकांनाही समान वागणुक द्या. 
जल : तुमच्यापाशी येणाऱ्याचे अज्ञान, मल साफ करून त्यांना प्रेम देऊन शांत आणि तृप्त करा.
अग्नी : तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वीकारा. ज्ञानाच्या उष्णतेने भस्म करा. 
चंद्र : कालगतीप्रमाणे सर्वांना उत्कर्ष, अपकर्ष अनुभवावा लागतो. तुम्ही स्वत: पूर्ण आहात. तुम्ही क्षय आणि वृद्धी या दोन्ही कला आत्मसात आहेत.
सूर्य : तुमच्याकडे असणाऱ्या सर्व गुण संपत्तीचे विश्वस्त व्हा. त्यांच्याबद्दल जराही काळजी बाळगू नका. निष्कामपणे सेवा करत राहा.
अजगर : दोन वेळच्या घासाची चिंता करून का.


महासागर : पूर्ण व्हा व सुख दु:खाच्या पलिकडे राहा. 
पतंग (किटक) : इच्छेचा नायनाट करा, अन्यथा ती तुमचा नाश करेल. इच्छारूपी अग्नीत जळण्यासाठी आपण त्यात उडी घालत असतो. अग्नी आपल्याला जाळायला येत नाही.
मधमाशी : आवश्यक्यतेपेक्षा अधिक सामग्री जमा करण्यामुळे अनर्थाला आमंत्रण होते.
भ्रमर : सर्वांमध्ये वास करणारी परमेश्वरी शक्ती अनुभवा.
हत्ती : मैथुनाची इच्छा सामर्थ्यवानालाही भुईसपाट करते.
मत्स्य : खाण्यातील गोडी ही सर्वात मोठी आसक्ती असून सर्व इच्छा आदिबीज आहेत.
वेश्या : सत्य जाणा आणि त्वरित पूर्ण सुखाच्या, आनंदाच्या दिशेने वाटचाल करा.
टिटवी : स्वत:च्या सुरक्षिततेसाठी स्वत:ची संपत्ती सोडण्याची तयारी ठेवा. 
तीन महिन्याचे बाळ : चिंतामुक्त राहा आणि आनंदी राहा.
भांडे : एकांतातच खरी शांतता नांदते.
लोहार : एकाग्रचित्तता हा अतिशय मौल्यवान गुण आहे.
सर्प : आपली स्वरूपस्थिती कोणालाही कळू न देता तिच्या जपण्याबद्दल सावध असावे. 
कीटक : जगाच्या सहवासात जरुरीपुरतेच राहावे.
कोळी : प्रापंचिक जबाबदाऱ्य अनंत आहेत त्यांना मर्यादित करणे शिका. त्यांच्यापासून अलिप्त राहा. 

Web Title: Read what we should learn from these 24 'gurus' of nature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.