कोणत्या दिशेला बसून केलेले भोजन लाभदायक आणि आरोग्यदायी ठरते, वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:32 PM2021-04-22T18:32:01+5:302021-04-22T18:32:21+5:30
अन्न ग्रहण करण्याप्रमाणे ते कोणत्या दिशेकडे पाहून करू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जेवणाचे काही नियम आहेत. ते पाळले गेले, तर अन्न अंगी लागते आणि निरोगी आयुष्य जगता येते. ज्याप्रमाणे पलंगावर बसून जेवणे निषिद्ध मानले जाते त्याप्रमाणे जेवताना कोणती दिशा लाभदायक ठरते, यांचे नियम पाळले तर ते निश्चितच आपल्याला लाभदायक ठरतील.
पूर्व दिशा : पूर्व दिशेकडे तोंड करून जेवायला बसले असता आजार कमी होतात. ज्येष्ठ मंडळीदेखील पूर्व दिशेला नेहमी प्राधान्य देत असत. पूर्व दिशेकडे तोंड करून जेवल्याने अन्न पचन चांगले होते, रक्ताभिसरण सुधारते आणि अन्न अंगी लागते.
उत्तर दिशा : ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्ती व्हावी, विद्या प्राप्ती व्हावी आणि ईश्वरी आशीर्वादाची प्राप्ती व्हावी असे वाटते त्या लोकांनी उत्तर दिशेकडे तोंड करून जेवल्यास त्यांना लाभ होतो.
पश्चिम दिशा : व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वर्गाच्या लोकांनी तसेच ज्यांच्यावर बौध्दीक कार्याची जबाबदारी अधिक असते, अशा लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून जेवले पाहिजे.
दक्षिण दिशा : दक्षिण दिशेकडे तोंड करून जेऊ नये. अन्न अंगी लागत नाही. तसेच या दिशेचा वाईट प्रभाव अन्नावर पडतो. मात्र सामूहिक भोजन घेत असाल तर या दिशेचे दुष्परिणाम होणार नाहीत.