बाकीच्या पासवर्डप्रमाणेच 'हा' बहुमूल्य पासवर्ड लक्षात ठेवा; सांगताहेत डॉ. राजीमवाले आजच्या live चर्चासत्रात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:21 AM2021-04-26T11:21:34+5:302021-04-26T11:22:09+5:30
सुखाचा पासवर्ड आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी आणि सुखाचे अकाउंट उघडण्यासाठी लोकमत भक्ती च्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आज म्हणजेच २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता या चर्चासत्रात अवश्य सहभागी व्हा!
पासवर्ड म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या कुलुपाची चावी. ती हरवली, तर आपण अडचणीत येऊ शकतो आणि चुकीच्या हाती लागली, तरी मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून हा पासवर्ड गोपनीय ठेवावा लागतो. परंतु, एक पासवर्ड असा आहे, जो डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आज लोकमत भक्तीच्या live चर्चासत्रात जाहीरपणे सांगणार आहेत. तो आहे, 'सुखाचा पासवर्ड!' हा पासवर्ड जनरेट कसा करायचा आणि लक्षात कसा ठेवायचा याबाबत खुलासा करून घेण्यासाठी अभिनेत्री धनश्री काडगावकर डॉ. राजीमवाले यांच्याशी संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
हा पासवर्ड आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी आणि सुखाचे अकाउंट उघडण्यासाठी लोकमत भक्ती च्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आज म्हणजेच २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता या चर्चासत्रात अवश्य सहभागी व्हा!