Ritual: कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे शास्त्र माहीत आहे का? जाणून घ्या लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:26 IST2025-03-28T15:25:51+5:302025-03-28T15:26:31+5:30

Ritual: मंदिरात देवदर्शन घेतल्यावर आपले पाय आपोआप गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला प्रदक्षिणेसाठी वळतात, पण या प्रथेमागे कारण काय ते जाणून घ्या. 

Ritual: Do you know the scriptures on how many rounds should be performed around which God? Know the benefits! | Ritual: कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे शास्त्र माहीत आहे का? जाणून घ्या लाभ!

Ritual: कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे शास्त्र माहीत आहे का? जाणून घ्या लाभ!

मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते. देवदर्शन घ्यावे, प्रदक्षिणा घालावी आणि घटका दोन घटका त्या वातावरणात नामःस्मरण करत बसावे अशी आपल्याला बालपणापासून शिकवण मिळाली आहे. पण असे केल्याने नेमके काय साध्य होते, ते जाणून घेऊ. 

मंदिरात मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारीबाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घालत्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. सर्वसाधारणपणे मंदिरात गेल्यावर कमीतकमी तीन प्रदक्षिणा कराव्यात. मात्र महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारींना ओलांडू नये. जलधारीपर्यंत पोहचून मागे येण्याला प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते. तसेच कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याबद्दलही नियम आहेत. ते जाणून घेऊ. 

कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा?

>> श्रीगणेशाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. यामुळे श्रीगणेश भक्ताला रिद्धी-सिद्धी सहित समृद्धीचा वर देतात.
>> महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तावर प्रसन्न होतात.
>> देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते. देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते.
>> भगवान नारायण अर्थात् विष्णूदेवाला तीन प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
>> एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
>> श्रीरामाचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे.
>> प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबू नये.
>> प्रदक्षिणा जेथून सुरु केली तेथेच समाप्त करावी. प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही.
>> प्रदक्षिणा घालताना बोलू नये.
>> ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवाचे स्मरण करावे.
>> प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभाऱ्याच्या) बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे रहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा.
>> प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. 
>> प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागतभावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी.
>> प्रदक्षिणा घालतांना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करुन नये. 
>> काही वेळा नवस बोलून प्रदक्षिणा घातली जाते. ५१, १०८, १००८ अशा प्रदक्षिणा घालतात. 
>> जेवणापूर्वी प्रदक्षिणा घालाव्यात किंवा संध्याकाळी. जेवून प्रदक्षिणा घालू नयेत. 
>> नमस्कार करताना देवाच्या उजवीकडे येऊन नमस्कार करावा.

प्रदक्षिणा घालताना करायची प्रार्थना :

(प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे.) प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी, ‘हे ….. (देवतेचे नाव उच्चारावे), तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालतांना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मीची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे.’ हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असतांना गाभाऱ्याला बाहेरच्या अंगाने (बाजूने) स्पर्श करू नये. 

प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा : 

यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।

या मंत्राचा अर्थ आहे की कळत-नकळत घडलेले आणि पूर्व जन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे. परमात्मा मला सद्बुद्धि प्रदान करा.
प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारीबाजूला फिरुन केली जाते परंतू काही मंदिर किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकं जागा नसते, अशा स्थितीत मूर्तीसमोरच गोल फिरुन प्रदक्षिणा केली जाते. 

Web Title: Ritual: Do you know the scriptures on how many rounds should be performed around which God? Know the benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.