Rituals: दिव्याची शिल्लक राहिलेली वात फेकू नका; त्याआधी वाचा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:00 AM2024-06-11T07:00:00+5:302024-06-11T07:00:02+5:30

Rituals: देवासमोर दिवा लावण्याचा प्रघात घरोघरी आहे, पण तो तेवत ठेवणारी वात योग्यरीत्या विसर्जित करावी असे शास्त्र सांगते, त्याचे नियम. 

Rituals: Do not throw away the remaining wick of the lamp; Before that read 'these' rules! | Rituals: दिव्याची शिल्लक राहिलेली वात फेकू नका; त्याआधी वाचा 'हे' नियम!

Rituals: दिव्याची शिल्लक राहिलेली वात फेकू नका; त्याआधी वाचा 'हे' नियम!

शुभं करोति म्हणताना त्यात एक ओळ आहे, ज्यात 'दिवा जळू दे सारी रात' असे म्हटले आहे. म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत, निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल, तूप घालण्याएवढे वैभव आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना केली आहे. छोट्याशा ओळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना? वैभव आपल्याला, उजेड देवाला आणि सौख्य घराला! म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावण्याचा प्रघात आहे. जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो. पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय? तेही जाणून घेऊ. 

घरात सुख, समृद्धी, शांती नांदावी म्हणून आपण सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो. बाहेर कितीही झगमगाट असला तरी संथ तेवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते. देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच, पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते. त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते. 

परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही, त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते. ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो, पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो. पण शास्त्रात म्हटले आहे, की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका. तर पुढील नियमांचे पालन करा. 

>> ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो, त्याबरोबरच अर्धवट जळलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 

>> निर्माल्याच्या फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळलेल्या वातीला चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरावे. 

>> हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे, आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळलेली वात विसर्जित करावी. 

>> तसेच देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये, थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी, अर्थात दिव्याला निरोप द्यावा. 

>> रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी. तेलात भिजवावी. मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा ठेवावा. 

>> निरांजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या न वापरता तुपात भिजवून ठेवाव्या, मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा. 

>> तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नये. 

>> देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप, तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी. 

>> दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार ठेवाव्यात. 

>> काजळी धरेल एवढी मोठी वात ठेवू नये. दिव्याची ज्योत नेहमी माध्यम असावी. 

>> वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

>> वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्माल्यात टाकून वरील दिलेल्या नियमाप्रमाणे वापर करावा. 

Web Title: Rituals: Do not throw away the remaining wick of the lamp; Before that read 'these' rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.