Rituals: शनिदेवाला तिळाचेच तेल का वाहायचे? आनंद रामायणात सापडते कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:12 PM2024-06-14T13:12:55+5:302024-06-14T13:13:30+5:30
Rituals: शनिवारी तेलाची खरेदी करू नये असे म्हणतात, अन्यथा आर्थिक स्थितीत बिघाड होतो, पण तिळाचेच तेल का वाहायचे? याचे कारण जाणून घेऊ.
उडीद, तेल, शेंदूर, रुईच्या पान फुलांचा हार या वस्तू शनिदेवाला प्रिय आहेत. म्हणून दर शनिवारी आपण न चुकता या गोष्टी त्यांना अर्पण करतो. मात्र यापैकी तिळाचे तेल हे शनिवारी विकत घेऊन वाहू नका असे आनंद रामायणात म्हटले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
शनिवार हा शनिदेव च्या पूजे साठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त करण्यसाठी वेगळे वेगळया पद्धतीने पूजन सांगितलं आहे. शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये या बद्दल देखील माहिती घेऊ.
ज्योतिष शास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये, असे केल्याने शनी चा कुप्रभाव आपल्या सम्पूर्ण घरावर पडत असतो, शनी कृपे साठी शनिवारी शनिदेवा वर तेल अर्पण करणे आवश्यक आहे, ते घरून आणलेले असावे.
तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व (आनंदरामायण)
हनुमानाची जेव्हा शनीची महादशा सुरू होती, त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते. राक्षसगण रामसेतूला हानी पोहचवणार याची कायम काळजी होती. त्यावेळेस रामसेतुकचे रक्षण करण्याची, पहारा देण्याची जबाबदारी हनुमंतावर होती. शनिपीडेची हनुमंताला कल्पना होती. त्याने शनिदेवाला विनंती केली, की रामकार्य पूर्ण होउदे मग मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो, तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटेल ते करा, फक्त आता मला रामसेवा करू द्या. त्याची स्वामीभक्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत पाहून शनिदेवांनी त्याला आशीर्वाद दिला व म्हणाले, तुला जे त्रास देतील त्यांना आधी माझा सामना करावा लागेल. असे म्हणत शनिदेव हनुमंताचे कवच बनून राहिले. त्यापुढच्या कालावधीत शनिदेवांना अनेक घाव सहन करावे लागले. म्हणून रामकार्याची पूर्तता होताच हनुमंतांनी शनिदेवाला तेल वाहून, त्यांच्या अंगाचे मर्दन करून त्यांची सेवा केली. या सेवेने शनिदेव तृप्त झाले आणि म्हणाले, तुझ्यासारखीच सेवा जो भक्त मनोभावे करेल त्याचे संकट मी दूर करेन.
म्हणून दर शनिवारी शनी देवाला तिळाचे तेल जरूर वाहावे.