Mahabharat Story: महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:05 PM2021-05-03T13:05:34+5:302021-05-03T13:06:10+5:30
Mahabharat Story: श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर रुक्मिणीने भीष्म पीतामह आणि दानशूर कर्णाच्या वधाबाबत प्रश्न विचारले.
सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी महाभारत युद्ध झाल्याचे सांगितले जाते. महाभारत युद्धात अनेकविध गोष्टी घडल्याचे म्हटले जाते. धर्म आणि अधर्म या तत्त्वांवर हे युद्ध सुरू झाले. हजारो योद्धे यात सहभागी झाले. हजारोंना वीरमरण आले. १८ दिवस तुंबळ युद्ध झाल्यानंतर अखेर पांडवांचा जिंकले. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता पांडावांना विजयश्री प्राप्त करून दिली. याच महाभारत युद्ध भूमीवर कालातीत असलेले गीताज्ञान ब्रह्मांडाला मिळाले. मात्र, महाभारत संपल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर रुक्मिणीने भीष्म पीतामह आणि दानशूर कर्णाच्या वधाबाबत प्रश्न विचारले. यावर श्रीकृष्णांनी नेमके उत्तर दिले. श्रीकृष्ण नेमके काय म्हणाले? वाचा...
सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक
रुक्मिणीने श्रीकृष्णांना विचारले की, द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांसारख्या नेहमी धर्माचे, सत्याच्या बाजूने उभ्या राहण्याऱ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या वधाचे समर्थन आपण कसे काय केले? यावर, श्रीकृष्ण उत्तरले की, हे खरे आहे. या दोघांनी आयुष्यभर धर्म पाळला. सत्याची कास सोडली नाही. मात्र, त्यांनी केलेल्या एका पापामुळे दोघांनी आपले सर्व पुण्य गमावले. काहीसे आश्चर्यचकीत होऊन रुक्मिणीने श्रीकृष्णांना विचारले की, ती पापे कोणती? याबाबत मला सांगावे.
सुखी आणि समृद्ध जीवनासाठी रोज सकाळी न चुकता सूर्याला अर्घ्य द्या!
श्रीकृष्णांनी सांगितले की, द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, त्यावेळी हे दोघे त्या राजसभेत उपस्थित होते आणि वडील होण्याच्या नात्याने ते दुःशासनाला आज्ञा देऊ शकले असते. पण, त्यांनी तसे नाही केले. या पापामुळे त्यांचा धर्म लहान झाला. श्रीकृष्णाच्या उत्तराने रुक्मिणीचे काहीसे समाधान झाले. मग रुक्मिणीने कर्णाबाबत प्रश्न केला. कर्णाचे काय? तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. त्याने कधीच कोणालाही आपल्या दारातून रिकाम्या हाती पाठवले नाही. मग त्याच्या बाबतीत असे का झाले?
मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान
कर्ण आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता. त्यांने कधीच कोणाला नाही म्हटले नाही, हेही तितकेच खरे. परंतु, जेव्हा सर्व योद्धांशी लढून अभिमन्यू घायाळ होऊन रणांगणात पडलेला असताना त्याने जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. कर्ण जिथे उभा होता, तिथे जवळच पाण्याचा खड्डा होता. जगाला मदत करणाऱ्या कर्णाने प्राणाशी झुंजणाऱ्या अभिमन्यूला पाणी दिले नाही. म्हणूनच त्याने केलेले सर्व पुण्य नष्ट झाले. नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचे चाक अडकले, असे श्रीकृष्णांनी सांगितले.
समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ!
आपल्या आजूबाजूला काहीतर चुकीचे घडत असल्याची जाणीव असून तसेच आपण त्या स्थितीत असूनही काही करू शकत नाही. असे केल्याने आपण त्या पापाचे समान भागीदार ठरतो. कुठल्याही जीवाने केलेले कर्म ते चांगले असो किंवा वाईट असो, शतकांपर्यंत आपला पाठलाग सोडत नसतात. विचार आपल्या हट्टी मनावर नियंत्रण करण्यासाठी मनाची अत्यंत सूक्ष्म क्रिया असते, असे श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगतात.