Dhanu Rashi Bhavishya 2022: धनु रास वार्षिक राशीभविष्य: नशिबाची उत्तम साथ, व्यवसायात मोठे लाभ; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:18 AM2021-12-31T11:18:14+5:302021-12-31T11:19:27+5:30
Dhanu Rashifal 2022: सन २०२२ वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकेल. आर्थिक आघाडी, कुटुंब, करिअर क्षेत्रासाठी कसे असेल नवीन वर्ष? जाणून घेऊया...
सन २०२२ वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकेल. तुमच्या नवव्या स्थानाचा स्वामी सूर्य हा तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. या काळात तुम्ही वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वी ठराल. या काळात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवू शकता. तसेच, या कालावधीत तुम्हाला अधिकार्यांकडून उत्तम पाठिंबा मिळू शकतो. धनु राशीचे लोक जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील बाजारपेठेत मोठे लाभ मिळू शकतात.
एप्रिलनंतर तुमच्या दहाव्या स्थानी गुरु ग्रह असेल. जे शिक्षण क्षेत्रात किंवा शिक्षक म्हणून काम कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या भावंडांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि त्यांच्या मदतीमुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन आणि सकारात्मक बदल करू शकता.
सन २०२२ मध्ये करिदृष्ट्या शुक्र जून महिन्यात तुमच्या सहाव्या भावातून भ्रमण करेल, ज्यामुळे बँकिंग क्षेत्र, वाहन उद्योग, डिझाइनिंग किंवा स्टाइलिंगसारख्या सर्जनशील क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तुमच्या कामावर तुमची चांगली पकड असू शकते आणि या काळात तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंददायी राहू शकेल आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुमचे कौशल्य सिद्ध करू शकाल.
सन २०२२ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बुध तुमच्या दशम भावातून मार्गक्रमण करेल, जो मार्केटिंग, मीडिया, पत्रकारिता आणि शिक्षण या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या ग्राहकांशी चांगला संवाद साधू शकता, या कालावधीत तुम्ही तुमच्या क्षमता आणि मुत्सद्देगिरीच्या कौशल्यांमुळे तुमच्या संस्थेमध्ये नाव कमवू शकाल.
या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. परंतु, फक्त विद्यार्थ्यांनी आपल्या अति आत्मविश्वासावर थोडे नियंत्रण ठेवायचा आहे. कुटुंबाचा विचार करता धनु राशीच्या लोकांना या वर्षी कुटुंबसौख्य चांगले मिळेल. जुने काही वाद असतील तर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.