परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 08:36 PM2020-12-09T20:36:23+5:302020-12-09T20:38:02+5:30

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो.

Saint Kabir wrote about who commit hypocrisy in the name of charity! | परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

Next

कबीरांची भाषा रोखठोक आणि सडेतोड आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या काव्यावरून येईल.

जंगल जाकर काहेकू बैठे, सुनले बावा साधु,
बैठे जागो सुखसे बैठो, मत होना भोंदु,
रामनाम जपोरे, अंतर शुद्ध रखो रे,
जनम मरनकी गठरी खोलो, संतपगसे रखो ध्यान,
जटाजूट और आसन मुद्रा काहेकू झुटा ग्यान,
तीरथ बरत जोग काके शीर मुंडाके बैठा है,
चुप कहासे घुसाघुसी आगे शिरपर सोटा है,
निशिदिनी धुनी राम नामकी लगादे अपने मनमो,
कहत कबीर सुनो भाई साधु नही तो, फत्तर है जंगलमो।

अरण्यात जाऊन कशाला बसले पाहिजे? तू ज्या जागी बसला आहेस, तिथेच बस! जंगलात जाऊन बसण्याचे व्यर्थ ढोंग करू नकोस. रामनाम जप आणि मन शुद्ध ठेव. उगाचच दाढी आणि जटा वाढवू नकोस. संतांच्या चरणी विश्वास ठेव. जन्ममरणाची चिंता अकारण करत बसू नकोस. आसन, मुद्रा आणि योगशास्त्रातल्या गोष्टी बाजूला ठेव. खोटे ज्ञान काय कामाचे? योग्यासारखे भगवे कपडे अंगावर चढवले, तीर्थाला गेले आणि डोक्याचे मुंडन करून घेतले म्हणून मनातले खोटे विचार थोडेच दूर होणार आहेत?

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

रामनामाची मोठ्या आवाजात धून कशाला लावली पाहिजे? आपल्या मनात नाम नाही का घेता येणार? अरे, आपल्या मनात अखंड जप चालू ठेव. मनातील अविचारांचा अंधार दूर कर. ज्ञानाचा दिवा लाव. सद्विचारांच्या उदबत्तीचा सुगंध दाही दिशांत दरवळू दे. असे वागलास, मग आहेच तिथेच परमेश्वराचा खरा भक्त होशील. 

तू जंगलात जाऊन काय करणार आहेस? जंगलात काय दगड थोडे आहेत का? तू असे ढोंग करून जंगलात गेलास, तर त्या दगडात आणखी एकाची भर पडेल. दुसरे काय होणार? हाच विचार आणखी एका पदात ते मांडतात,

काहेकू जंगल जाता बच्चे, काहेकू जंगल जाता?
घर बैठे रामही देको, अंदर भीतर भरपुर उजाला, 
भयो आपनेही सात।
येही जनम सुखके कारक साधु संतसो मानो,
जान जायगी क्या फल पाया, 
इतना कहना मानो।
बडा कुवा आगे भया, काहेकू इसमें डुबता?
जोरू लरके नाता पुती, आखर अकेला तू जाता।
कहत कनीर सुनो भाई साधु, अखंड भजो तुम राम,
भजन करो किसे ना डरो, जमका कछु न चले काम।

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही तरी तू काय मिळवणार आहेस? पुढे तर प्रचंड मोठी विहीर आहे. तुला त्या विहिरीत बुडून जायचे नाही ना? पत्नी, पुत्र, कन्या, सगळे नातेवाईक इथेच राहणार आणि तू एकटाच तुझ्या रस्त्याचे जाणार आहेस. म्हणून कबीर सांगतात, रामाचे नाव घे. कोणाची चिंता करू नकोस आणि निर्भयपणे रामनाम घे. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

Web Title: Saint Kabir wrote about who commit hypocrisy in the name of charity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.