Samudra Shastra: तुमच्या तळहाताच्या रेषा पुसट आहेत की ठळक? जाणून घ्या तुमचे भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 08:43 AM2024-08-28T08:43:58+5:302024-08-28T08:44:24+5:30
Samudra Shastra: भाग्यवंत होण्यासाठी तुमच्या तळहाताची ठेवण समुद्र शास्त्राला अनुकूल आहे का ते जाणून घ्या!
एखाद्या व्यक्तीची कुंडली त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांची गणना करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामनुसार व्यक्तीच्या तळ हाताची ठेवणं पाहून तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये ओळखता येतात. तुम्हीदेखील जाणून घ्या ती वैशिष्ट्ये!
ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीला विशेष महत्त्व आहे, ही कुंडली पाहून ज्योतिषी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घटनांची माहिती आधीच देतात. याशिवाय तुमची कुंडली हे देखील सांगते की भावी आयुष्य कसे असणार आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची ठेवणं आणि त्यावरील तीळ किंवा इतर खुणा यावरून भाकीत केले जाते. त्याचे दाखले पुढीलप्रमाणे-
लहान तळहाताचा अर्थ
जर एखाद्या व्यक्तीची तळहात लहान असेल तर असे मानले जाते की त्याचे जीवन खूप आनंदी असेल. ज्यांचे तळवे लहान आहेत त्यांच्यासाठी असे म्हटले जाते की ते स्वच्छ मनाचे लोक आहेत. याशिवाय लहान तळवे असलेल्या लोकांना गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप इच्छा असते. असे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात. ज्यांच्या हाताच्या भाग्यरेषा ठळकपणे दिसतात, असे लोक आपल्या जोडीदाराला कायम आनंदात ठेवतात.
मोठ्या तळहाताचा अर्थ
ज्यांचे तळवे मोठे असतात, त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांसमोर नेहमी पैशाची कमतरता भासते, पण त्यांच्या आयुष्यात आनंद कायम राहतो. पैशांची कमतरता असूनही अशा लोकांच्या जीवनात सुख-सुविधांची उणीव भासत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात प्रेम प्रकरणाचे अनेक प्रसंग येतात, तरीदेखील असे लोक आपल्या जोडीदारालाच प्राधान्य देतात आणि आपले नाते जीवापाड जपतात.
मऊ आणि कठोर हस्तरेखाचा अर्थ
ज्यांचे तळवे मऊ असतात अशा लोकांना खूप आनंद मिळतो. तर कठोर तळवे असलेल्या लोकांना खूप परिश्रम करावे लागतात. ज्यांचे तळवे मऊ असतात ते हळव्या मनाचे असतात, तर कठोर तळवे असलेले लोक संवेदनशील असूनही भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात. त्यांना प्रत्येक बाबतीत संघर्ष करावा लागतो. त्यांच्या हाताच्या रेषा अस्पष्ट असतात, त्यामुळे अपार मेहनत करून त्यांना त्यांचे भाग्य घडवावे लागते. ज्यांचे तळवे मऊ असतात, असे लोक प्रेम प्रकरणात अनेकदा अडकतात, तर कठोर तळवे असलेले लोक सहसा प्रेमात पडत नाहीत आणि पडलेच तर शेवट्पर्यंत निभावतात.