Samudra Shastra: शरीरावर तीळ सगळ्यांनाच असतो, पण समुद्र शास्त्रानुसार कोणता तीळ ठरतो भाग्यकारक? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:46 AM2024-02-06T10:46:56+5:302024-02-06T10:47:08+5:30

Samudra Shastra: तीळ कोणाच्या सौंदर्यात भर घालतो तर कोणाला अनाठायी असल्याने कुरूप बनवतो, मात्र तो भाग्यकारकही ठरू शकतो, कसा ते पहा!

Samudra Shastra: Everyone has a mole on their body, but according to Samudra Shastra, which mole is considered lucky? Read on! | Samudra Shastra: शरीरावर तीळ सगळ्यांनाच असतो, पण समुद्र शास्त्रानुसार कोणता तीळ ठरतो भाग्यकारक? वाचा!

Samudra Shastra: शरीरावर तीळ सगळ्यांनाच असतो, पण समुद्र शास्त्रानुसार कोणता तीळ ठरतो भाग्यकारक? वाचा!

तीळ हा आरोग्यशास्त्रात अतिशय गुणकारी मानला जातो. अरेबियन कथांमध्ये खजिन्याचा दरवाजा उघडताना खुलजा सिम सिम सारखे तिळा तिळा दार उघड म्हटले जात. केवळ भारतीय संस्कृतीच नाही तर पाश्चात्य संस्कृतीतही तीळ किती महत्त्वाचा आहे हे यावरून लक्षात येते. तसेच समुद्रशास्त्रात तीळ भाग्यकारक मानला जातो. फरक एवढाच की हा तीळ अन्न पदार्थातील नसून शरीरावर असणारी काळी खूण असते. त्यातही ती खूण चेहऱ्याच्या  कोणत्या भागात असणे भाग्यकारक मानले जाते, ते समुद्र शास्त्राच्या आधारे जाणून घेऊ. 

स्त्री-पुरुष दोहोंच्या शरीरावर तीळ असतो. काहींना जन्मापासून तर काहींना वाढत्या वयानुसार. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तयार होणाऱ्या तीळांचे अर्थ समुद्रशास्त्रात दिलेले आहेत. यातील काही तीळ फार कमी लोकांच्या चेहऱ्यावर आढळतात आणि ते नशीब बदलणारे ठरतात. 

नाकावर तिळाचा अर्थ- नाकावर तीळ असणे म्हणजे व्यक्ती खूप प्रतिभावान असते. ती व्यक्ती आनंद आणि समृद्धीने भरलेले जीवन जगते. तसेच महिलांच्या नाकावर तीळ असणे हे देखील भाग्याचे लक्षण समजले जाते. 

पापण्यांजवळ तीळ असण्याचा अर्थ - पापण्यांवर तीळ असणारी व्यक्ती खूप संवेदनशील असते.

डोळ्यावर तिळाचा अर्थ - पुरुषाच्या उजव्या डोळ्यावर तीळ असेल तर त्याचे पत्नीसोबत चांगले जमते, तर डाव्या डोळ्यावर तीळ असल्यास नातेसंबंधात वितुष्ट येते. हीच बाब स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते. 

भुवयांवर तिळाचा अर्थ- ज्या लोकांच्या भुवयांवर तीळ असतात, त्यांचे आयुष्य अनेकदा प्रवासात व्यतीत होते. कपाळाच्या उजव्या भागावर तीळ म्हणजे आनंदी जीवन, तर कपाळाच्या डाव्या भागावर तीळ सुखी वैवाहिक जीवन दर्शवते.

डोळ्याच्या बुबुळावर तिळाचा अर्थ - खूप कमी लोकांच्या डोळ्याच्या बुबुळावर तीळ असतो पण तो खूप महत्त्वाचा असतो. हा तीळ माणसाचे विचार कसे असतात हे सांगतो. उजव्या डोळ्याच्या बाहुलीवर तीळ असणे म्हणजे व्यक्ती उच्च विचारांचा धनी असतो, याउलट डाव्या बाहुलीवर तीळ विकृत मानसिकता दर्शवतो. जसे की चित्रपटातील खलनायकांमध्ये दर्शवतात!

कानावर तिळाचा अर्थ- कानावर तीळ असणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत असतात. विचारशील, चिंतनशील असतात. ते उत्तम श्रोता असतात. लोक त्यांच्याकडे विश्वासाने आपले सुख दुःख सांगतात. 

ओठांवर तिळाचा अर्थ- महिलांच्या ओठांवर तीळ असल्यास त्यांचे सौंदर्य वाढते. तसेच, समुद्रशास्त्रानुसार, ओठावर तीळ असलेली व्यक्ती-प्रेमळ हृदयाची असते. ओठाखाली तीळ असलेली व्यक्ती श्रीमंती उपभोगते. 

चेहऱ्यावर तिळाचा अर्थ- चेहऱ्याच्या कोणत्याही भागात तीळ असणे  स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शुभ आहे. चेहऱ्यावरील तीळ आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचे आणि भाग्यवान असल्याचे लक्षण दर्शवतो.

गालावर तीळचा अर्थ- गालावर लाल तीळ असणे खूप शुभ असते. डाव्या गालावर काळा तीळ असल्यास आयुष्य खडतर जाते तर उजव्या गालावर काळा तीळ असल्यास माणूस श्रीमंती उपभोगतो.

Web Title: Samudra Shastra: Everyone has a mole on their body, but according to Samudra Shastra, which mole is considered lucky? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.