Sankashthi Chaturthi 2024: गणपतीची 'खरी' ओळख होण्यासाठी मुलांना 'ही' माहिती आवर्जून सांगा'- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:56 PM2024-07-24T12:56:44+5:302024-07-24T12:57:22+5:30

Sankashthi Chaturthi 2024: गणपती बाप्पा हे आपले लाडके दैवत असले तरी त्याच्याबद्दल अचूक माहिती पुढच्या पिढीला कळणे गरजेचे आहे, ती माहिती देत आहेत सद्गुरू!

Sankashthi Chaturthi 2024: Tell 'this' information to children to know 'True' Ganpati' - Sadhguru | Sankashthi Chaturthi 2024: गणपतीची 'खरी' ओळख होण्यासाठी मुलांना 'ही' माहिती आवर्जून सांगा'- सद्गुरु

Sankashthi Chaturthi 2024: गणपतीची 'खरी' ओळख होण्यासाठी मुलांना 'ही' माहिती आवर्जून सांगा'- सद्गुरु

आबालवृद्धांचे आवडते दैवत म्हणजे गणपती. एक तर तो हाकेला पटकन धावून येतो, दुसरं म्हणजे पाहुणचार घेण्यासाठी आपल्या घरी येतो आणि तिसरी बाब म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, म्हणजे आपल्यावरील संकट दूर करतो. अशी ही मंगलमूर्ती पाहून सगळ्यांनाच प्रसन्न वाटतं. आपण त्याला प्रेमाने गणू, गणोबा, गजनना म्हणत असलो तरी त्याची मुख्य ओळख आहे ती म्हणजे गणपती! काय विशेष आहे या नामात? सांगताहेत सद्गुरु!

गणपतीची निर्मिती कशी झाली यामागची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि तो गजानन कसा झाला हेही ऐकिवात आहे. याबद्दल खुलासा करताना सद्गुरू सांगतात, गणपती म्हणजे शिवगणांचा प्रमुख आणि गज अर्थात हत्तीचे शीर त्याला जोडले म्हणून तो गजानन झाला. कवींनी त्याला विविध नामे उल्लेख करताना गजानन संबोधले, वास्तविक ही त्याची ओळख नाही तर गणपती हेच त्याचे प्रमुख नाम आहे. 

सद्गुरू सांगतात, गजानन म्हणजे हत्तीचे शीर धारण केलेला मानवी देह. हे आपण मुलांना शिकवतो. परंतु, त्याच्या डोक्याबद्दल कमी आणि पोटाबद्दल जास्त बोलतो. लंबोदर म्हणतो. तसा तो आहे, पण सुस्त, आळशी नाही. कारण त्याचं डोकं मानवी मेंदूपेक्षा कैक पटींनी जास्त काम करतं. 

ज्याचा मेंदू तल्लख तोच दूरदृष्टीने विचार करू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. नेतृत्त्व करू शकतो. भविष्याची आखणी करू शकतो. गणपतीचे मस्तक त्याचेच प्रतीक आहे. म्हणून गणपती बाप्पा मोदक खातो एवढेच मुलांच्या मनावर न बिंबवता तो बुद्धिदाता आहे, योद्धा आहे, शूर वीर आहे आणि उत्तम नेता आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. 

गणेश उत्सव असो नाहीतर दर महिन्यात येणारी विनायकी किंवा संकष्टी याच गोष्टींची जाणीव करून देते. बाप्पाकडून बोध घेत आपणही हे गुण अंगिकारले पाहिजेत, हा त्यामागचा हेतू आहे, असे सद्गुरु सांगतात. 

Web Title: Sankashthi Chaturthi 2024: Tell 'this' information to children to know 'True' Ganpati' - Sadhguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.