Sankashti Chaturthi 2023: नोकरीचा प्रश्न असो नाहीतर लग्नाचा; तुमचे कष्ट दूर करतील बाप्पाचे संकष्टी विशेष मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:06 PM2023-07-05T13:06:20+5:302023-07-05T13:06:45+5:30

Sankashti Chaturthi 2023: ६ जुलै रोजी चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे, दिलेल्या मंत्रांचा उपयोग करून तुम्हीदेखील या शुभ मुहूर्ताचा लाभ करून घ्या!

Sankashti Chaturthi 2023: Be it a matter of job or marriage; Bappa's Sankashti special mantra will remove your troubles! | Sankashti Chaturthi 2023: नोकरीचा प्रश्न असो नाहीतर लग्नाचा; तुमचे कष्ट दूर करतील बाप्पाचे संकष्टी विशेष मंत्र!

Sankashti Chaturthi 2023: नोकरीचा प्रश्न असो नाहीतर लग्नाचा; तुमचे कष्ट दूर करतील बाप्पाचे संकष्टी विशेष मंत्र!

googlenewsNext

२९ जूनपासून चातुर्मास प्रारंभ झाला आहे आणि ६ जुलै रोजी चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी येत आहे. चातुर्मास हा दानधर्माचा काळ म्हणून महत्त्वाचा ठरतो. त्यानिमीत्ताने पुण्यसंचय करता येतो आणि आपल्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत म्हणून प्रयत्नांना उपासनेची जोड दिली जाते. अशातच संकटाचे निवारण करणाऱ्या बाप्पाची आवडती तिथी म्हणजे संकष्ट चतुर्थी. या पावन दिवशी आपणही आपल्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेली उपासना करूया आणि आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून बाप्पाला प्रार्थना करूया. 

अनेक गणेश उपासक मनोभावे बाप्पाची पूजा करतात आणि उपासना म्हणून संकष्टीचा उपास देखील करतात. संकटाचे निवारण करणारा, अशी बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायावर आलेली गदा दूर व्हावी यासाठी संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी. त्यानंतरही उपासना सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. मात्र, निदान महिनाभर हे व्रत आचरावे असे गणेश पुराणात सांगितले आहे. 

आपल्या देशात आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता, त्यात कोव्हीड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक! तरीदेखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे. रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, म्हणून संकष्ट  चतुर्थीच्या मुहूर्तावर 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करा. 

>> रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सांयकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर ती वेळ उपासनेसाठी राखीव ठेवा. 

>> बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. महिलांना मासिक धर्म किंवा अन्य अडचणी असल्यास त्यांनी मनोमन गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना सुरू करावी. 

>> हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा. 

>> मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी. 

>> मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते. 

Web Title: Sankashti Chaturthi 2023: Be it a matter of job or marriage; Bappa's Sankashti special mantra will remove your troubles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.