Sankashti Chaturthi 2024: डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितले गणेश मंत्रांचे रहस्य आणि उपासनेचे भरघोस लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 09:38 AM2024-07-23T09:38:28+5:302024-07-23T09:50:14+5:30

Sankashti Chaturthi 2024:कलियुगात त्वरित प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान गणेश, त्याच्या उपासनेसंदर्भात दिलेले नियम पाळले तर लाभ होणारच म्हणून समजा!

Sankashti Chaturthi 2024: Dr. Balaji Tambe told the secret of Ganesha mantras and great benefits of worship! | Sankashti Chaturthi 2024: डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितले गणेश मंत्रांचे रहस्य आणि उपासनेचे भरघोस लाभ!

Sankashti Chaturthi 2024: डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितले गणेश मंत्रांचे रहस्य आणि उपासनेचे भरघोस लाभ!

आयुर्वेद आणि अध्यात्म यांचे गाढे अभ्यासक डॉ. बालाजी तांबे यांनी गणेश उपासने संदर्भात अतिशय रोचक माहिती दिली आहे. ते म्हणतात, कलियुगात देवी, शंकर, विष्णू, लक्ष्मी आणि गणपती या पंचदेवता लवकर प्रसन्न होणाऱ्या आहेत. पैकी गणपती बाप्पावर आपला स्नेह अधिक असल्याने तो जास्त जवळचा वाटतो आणि सुखकर्ता दुःखहर्ता हे त्याचे वैशिष्ट्य असल्याने तो सगळी विघ्न देखील दूर करून आनंद देतो. पुढे दिलेल्या प्रार्थनेसाठी मोजून तीन मिनिटेही लागत नाहीत. मात्र तेवढा वेळ देवासाठी दिलात तर देवही तुमच्यासाठी वेळ देईल हे नक्की!

तर मग या बाप्पाची उपासना कधी, कशी आणि किती वेळा करावी?

डॉ. बालाजी तांबे सांगतात, बाप्पाची उपासना त्रिकाळ करावी. पहाटे, सकाळी आणि संध्याकाळी! आपल्या दिवसाची मंगलमयी सुरुवात व्हावी असे वाटत असेल तर पहाटे उठा. प्रातःर्विधी आवरून घ्या. स्नान करा आणि श्री गणेश प्रात:स्मरण स्तोत्र म्हणा. 

प्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं सिंदूरपूरपरिशोभित गण्डयुग्मम् ।
उद्दण्डविघ्नपरिखण्डनचण्डदण्डं आखण्डलादि सुरनायक वृन्दवन्द्यम् ॥ १ ॥
प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानं इच्छानुकूलमखिलंच फलं ददानम् ।
तं तुंदिलं द्विरसनाधिप यज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय ॥२ ॥
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक-दावानलं गणविभुं वरकुंजरास्यम् ।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाहं उत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य ॥ ३ ॥
श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् ।
प्रातरुत्थाय सततं यः पठेत्प्रयतः पुमान् ॥ ४ ॥

हे स्तोत्र ऐका, म्हणा तसेच श्रवण करा. स्तोत्र ऐकून ऐकून लवकरच पाठ होईल. या स्तोत्राला पर्यायी स्तोत्र म्हणजे माउलींनी लिहिलेलं गणेश कवन- ओम नमोजी आद्या! पहाटे उठून ही स्तोत्र म्हणावीत. 

सकाळी आवरून घराबाहेर पडण्याआधी गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. या स्तोत्राच्या शीर्षकातच त्याचा लाभ दिलेला आहे. थर्व म्हणजे हलणे, अ म्हणजे नाही, शीर्ष म्हणजे शीर अर्थात आपले डोके किंवा मेंदू. आपला मेंदू, तथापि आपले विचार, मन आणि शरीराचे हेड कोर्टर शांत ठेवण्याचे काम हे स्तोत्र करते. त्यात सुरुवातीला ओम गं गणपतये म्हणताना अनुस्वारात म नाही तर न म्हणा, जेणेकरून पूर्ण मेंदू त्या स्वराने व्यापून जाईल आणि डोकं शांत राहील. म्हणून अथर्वशीर्ष कोमल गांधार आणि निषादात म्हणावे असं म्हणतात. 

गणपती ही नाददेवता आहे. बुद्धी, संतती, संपत्ती देणारी देवता आहे. तिची उपासना मनोभावे केल्यास निश्चितच लाभ मिळतो, असे स्तोत्र कारांनी देखील लिहून ठेवले आहे, तसेच गणेश भक्तांनी अनुभव घेतले आहेत. वरील दोन प्रार्थना झाल्यावर तिसरी सायं प्रार्थना गणेश स्तोत्राने करावी. 'प्रणम्य शिरसा देवं' तथा 'साष्टांग नमन हे माझे' या संकटनाशन स्तोत्र पठणाने करावी. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

Web Title: Sankashti Chaturthi 2024: Dr. Balaji Tambe told the secret of Ganesha mantras and great benefits of worship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.