गजानन महाराज प्रकट दिन: शेगावला जाणे शक्य नाही? काळजी करू नका, ‘अशी’ करा मानसपूजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:10 PM2024-03-02T15:10:48+5:302024-03-02T15:12:08+5:30

Gajanan Maharaj Prakat Din 2024: शेगावला जाऊन प्रत्यक्ष गजानन महाराजांचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, तरी सोप्या पद्धतीने घरीच मानसपूजा करणे शक्य आहे. जाणून घ्या...

sant gajanan maharaj prakat din 2024 know about how to do gajanan maharaj manas puja | गजानन महाराज प्रकट दिन: शेगावला जाणे शक्य नाही? काळजी करू नका, ‘अशी’ करा मानसपूजा!

गजानन महाराज प्रकट दिन: शेगावला जाणे शक्य नाही? काळजी करू नका, ‘अशी’ करा मानसपूजा!

Gajanan Maharaj Prakat Din 2024: शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख असलेल्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन रविवार, ०३ मार्च २०२४ रोजी आहे. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते. लाखो भाविक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात. मात्र, इच्छा असूनही शेगावला जाता येत नाही. अशावेळी गजानन महाराजांची मानसपूजा करू शकता. कशी? ते जाणून घ्या...

आपण आपल्या आराध्याची, देवतांची संतांची पूजा करतो, ती देवासाठी नाही, तर आपल्या मन: शांतीसाठी. आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचिये द्वारी उभे राहायला दोन क्षण सवड मिळत नाही. अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता, शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा, असे सांगितले जाते. मानसपूजा करताना देवपूजा करतो, तसा विधी करावा. मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा. आपल्या हृदयमंदिरात देवाचे आवाहन करावे. भक्ती भावाची फुले अर्पण करावी. श्रद्धेचा धूप दीप लावून मनापासून प्रार्थना करावी. एवढी सोपी आहे मानसपूजा. शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी भाविक दर्शनाला शेगाव संस्थानी आवर्जून जातात. ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले ते भाग्यवान; पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करावी.

भाव मनी ठेवून, करा मानसपूजा

गुरु गजानन सांगे, नाही सक्तीची मूर्तिपूजा,
भाव मनी ठेवून, करा मानसपूजा ।।

गुरु गजानन सांगे, नाही गेलात मंदिरी,
तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी।।

गुरु गजानन सांगे, नको पूजन अर्चन,
करा माझे स्मरण, करण्या मला आवाहन ।।

गुरु गजानन सांगे, नको पेटवू तो दीप,
सोडा अहंपणा येथ, जाळा मी पणाचा धूप ।।

गुरु गजानन सांगे, नको ती तेलवात,
मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात ।।

गुरु गजानन सांगे, नसू दे दुर्वा हिरव्या,
नामजपाच्या जुड्या, तुम्ही मला वहाव्या।।

गुरु गजानन सांगे, नको मोदक एकवीस,
करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस।।

गुरु गजानन सांगे, नको पिठले भाकरी,
धावा त्यांच्यासाठी, ज्यांना मदत आहे जरुरी।।

असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला,
नाही कशाचीच अपेक्षा, काव्यपुष्पांनी पुजला।। 

श्री गजानन, जय गजानन।।

गण गण गणात बोते ।।
 

Web Title: sant gajanan maharaj prakat din 2024 know about how to do gajanan maharaj manas puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.