Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्रीला आठवणीने करा मिठाचा तोडगा; पितृ व वास्तु दोषातून मुक्ती मिळवा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:58 PM2024-10-01T16:58:46+5:302024-10-01T16:59:07+5:30
Sarva Pitru Amavsya 2024: २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा प्रारंभ; त्या निमित्ताने आवर्जून करा दिलेला तोडगा!
२ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024)आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) देखील आहे. हा दिवस पितृपक्षाचा शेवट मानला जातो. अमावस्या आणि पौर्णिमा लक्ष्मी मातेची आवडती तिथी असल्याने आणि पुढच्याच दिवशी अर्थात ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रि (Navratri 2024)सुरू होणार असल्याने मिठाशी संबंधित उपाय करा. त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते. जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा ते!
ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. ग्रहस्थिती सुधारते. आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या, त्यामुळे मीठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात. ते पुढील प्रमाणे-
>> अमावास्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही, तर केवळ चमचा भर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता.
>> अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसभरापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
सर्वपित्री अमावस्येसाठी इतर उपाय
>> सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. यामुळे सुख समृद्धी मिळेल.
>> अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही.
>> अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पाणी घालावे आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते. कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे.
>> सर्वपित्री अमावस्येला एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी. शनी देवांचा आशीर्वाद लाभेल.
>> शनिदोष तथा पितृ दोषातून मुक्ति मिळावी म्हणून सर्वपित्री अमावस्येला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो. तसेच पितृ दोषातून मुक्ति मिळते.