Fifth Shravan Somvar 2021: पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, शुभ योग आणि महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:52 PM2021-09-05T18:52:18+5:302021-09-05T18:53:01+5:30

Fifth Shravan Somvar 2021: पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि शुभ योगांविषयी जाणून घेऊया...

sawan 2021 shivamuth mantra vrat puja vidhi shubh yoga and significance fifth shravan somwar | Fifth Shravan Somvar 2021: पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, शुभ योग आणि महात्म्य

Fifth Shravan Somvar 2021: पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, शुभ योग आणि महात्म्य

googlenewsNext

ॐ मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे| अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम:|| श्रावणात शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते. यंदाचे विशेष म्हणजे श्रावण महिन्याचा प्रारंभ आणि सांगता सोमवारी होत आहे. तसेच आणखी एक विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार येत असून, श्रावण महिन्याची सांगता सोमवती अमावास्येने होत आहे. पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि शुभ योगांविषयी जाणून घेऊया... (Fifth Shravan Somwar 2021 Date)

अमरनाथ गुहेत प्रकटते बाबा बर्फानी शिवलिंग; पाहा, ‘टॉप १०’ रहस्ये आणि काही अद्भूत तथ्ये

पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार, ०६ सप्टेंबर २०२१ रोजी असून, या दिवशी शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते. (Fifth Shravan Somwar 2021 Shivamuth)

महाभारतातील एक योद्धा ५ हजार वर्षानंतर आजही ‘या’ शिवमंदिरात दर्शनाला येतो? पाहा, मान्यता

महादेव शिवशंकरांची पूजा

सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

महादेवांच्या पूजनात बेलाच्या पानाला एवढे जास्त महत्त्व का असते? पाहा, अद्भूत तथ्ये

शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत आणि मंत्र

पाचव्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. दरम्यान, यंदाच्या वर्षी पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ६ सप्टेंबर रोजी आहे. (Fifth Shravan Somwar 2021 Shubh Yoga)

सप्टेंबर महिन्यात ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक काळ

सोमवती अमावास्या

सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सोमवार महादेव शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे सोमवारी येणाऱ्या अमावास्येचे महत्त्व वाढते. सोमवती अमावास्येला शंकराची पूजा, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त होते. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. 
 

Web Title: sawan 2021 shivamuth mantra vrat puja vidhi shubh yoga and significance fifth shravan somwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.