Sawan Somwar 2021: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा, शिवमुष्टी व्रताची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:29 PM2021-08-03T18:29:43+5:302021-08-03T18:30:43+5:30

Sawan Somwar 2021 Shivamuth: श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. जाणून घेऊया त्याविषयी...

sawan somwar 2021 proper method of flowing shivamuth on shravan somvar and its significance | Sawan Somwar 2021: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा, शिवमुष्टी व्रताची परंपरा

Sawan Somwar 2021: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा, शिवमुष्टी व्रताची परंपरा

googlenewsNext

भारतीय संस्कृती, परंपरा या केवळ एका पीढीकडून दुसऱ्या पीढीकडे जाणाऱ्या रुढी, पद्धती नसून, त्यामागे एक मोठे तत्त्वज्ञान, शिकवण दडलेली असल्याचे पाहायला मिळते. मराठी वर्षात आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. हिरव्या कच्च परिसरावर आरसपानी थेंबांचे आभाळ घेऊन झरझरणारा श्रावण हा चातुर्मासातील पहिला महिना. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. महाराष्ट्रात सोमवार, ०९ ऑगस्ट २०२१ ते सोमवार, ०६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत श्रावण मास आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. जाणून घेऊया त्याविषयी...

यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता

श्रावणी सोमवार

श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. (Shivamuth 2021)

श्रावणात सोळा सोमवारचे व्रत का सुरू करतात त्याची कथा व पूजाविधीसह सविस्तर माहिती!

श्रावणी सोमवारी शिवमुष्टीचे व्रत

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू (पाचवा श्रावणी सोमवार) यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते. (Sawan Somwar 2021 Shivamuth)

कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

शिवमूठ श्रावणातला मोठा वसा 

प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते. (Shivamuth 2021 Significance)

श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का करतात, त्यामागील कारण वाचा...

​दानाचे महत्त्व सांगणारी शिवामूठ

आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो, ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी.
 

Web Title: sawan somwar 2021 proper method of flowing shivamuth on shravan somvar and its significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.