सलग २१ दिवस पहाटे हनुमान चालिसा म्हणा आणि नैराश्यावर मात करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:00 AM2022-06-11T07:00:00+5:302022-06-11T07:00:01+5:30

हनुमान चालीसा या प्रभावी स्तोत्राची अनुभूती अनेक भाविकांनी घेतली आहे. तुम्हीसुद्धा या स्तोत्राची प्रचिती घेऊन बघा!

Say Hanuman Chalisa in the morning for 21 days in a row and overcome depression! | सलग २१ दिवस पहाटे हनुमान चालिसा म्हणा आणि नैराश्यावर मात करा!

सलग २१ दिवस पहाटे हनुमान चालिसा म्हणा आणि नैराश्यावर मात करा!

googlenewsNext

हनुमान चालीसा हे एक प्रासादिक स्तोत्र आहे. त्यातील शब्द तना-मनाला उभारी देणारे आहेत. तुम्ही जर तणावग्रस्त असाल, तर सलग २१ दिवस सूर्योदयापूर्वी उठून, प्रातःविधी आवरून मनोभावे पठण करा. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्यास तुम्हाला त्याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. 

हनुमान चालीसा ही अवधी भाषेत केलेली काव्यरचना आहे. त्यात रामभक्त हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे. हे एक अतिशय लघु काव्य आहे. ज्यामध्ये पवनपुत्र हनुमानाची सुंदर प्रशंसा केली गेली आहे. यामध्ये केवळ बजरंग बलीच नाही, तर प्रभू श्रीरामांचे व्यक्तिमत्त्वही सोप्या शब्दात कोरलेले आहे. चालीसा शब्दाचा अर्थ 'चाळीस' असा आहे कारण या स्तुतीमध्ये दोन कडव्यांच्या परिचय वगळता चाळीस  श्लोक आहेत. त्याचे लेखक गोस्वामी तुलसीदास आहेत. 

हे काव्य जरी संपूर्ण भारतात लोकप्रिय असले,तरीदेखील विशेषतः उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व हिंदूंना हे स्तोत्र पाठ असते. हिंदू धर्मात बजरंग बली हे शौर्य, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जातात. हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, मारुतीनंदन, केसरी नंदन, महावीर इत्यादी नावांनीही ओळखले जाते. हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. 

दररोज मारुतीरायाचे स्मरण करून त्याचा मंत्र जप केल्यास मानवाचे सर्व प्रकारचे भय दूर होते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. तुम्हालाही राग, ताणतणाव, नैराश्य यावर मात करायची असेल, तर दररोज थोडासा वेळ काढून भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करा. या सुंदर काव्यरचनेच्या श्रवणाने किंवा पठणाने भक्तिभाव जागृत होतो. 

जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन बरन बिराज सुबेसा। कानन कुंडल कुंचित केसा।।
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै। कांधे मूंज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन। तेज प्रताप महा जग बन्दन।।
विद्यावान गुनी अति चातुर। राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया।।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा। बिकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र के काज संवारे।।
लाय सजीवन लखन जियाये। श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
सहस बदन तुम्हरो जस गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा। नारद सारद सहित अहीसा।।
जम कुबेर दिगपाल जहां ते। कबि कोबिद कहि सके कहां ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा। राम मिलाय राज पद दीन्हा।।
तुम्हरो मंत्र बिभीषन माना। लंकेस्वर भए सब जग जाना।।
जुग सहस्र जोजन पर भानू। लील्यो ताहि मधुर फल जानू।।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डर ना।।
आपन तेज सम्हारो आपै। तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै। महाबीर जब नाम सुनावै।।
नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै। मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
सब पर राम तपस्वी राजा। तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै। सोइ अमित जीवन फल पावै।।
चारों जुग परताप तुम्हारा। है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे।।
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। अस बर दीन जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा। सदा रहो रघुपति के दासा।।
तुम्हरे भजन राम को पावै। जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्तकाल रघुबर पुर जाई। जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
और देवता चित्त न धरई। हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
जै जै जै हनुमान गोसाईं। कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई। छूटहि बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ हृदय मंह डेरा।।

Web Title: Say Hanuman Chalisa in the morning for 21 days in a row and overcome depression!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.