भयावह स्वप्नांमुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही? 'हे' तोडगे तुमच्या कामी येऊ शकतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:37 PM2022-12-10T13:37:05+5:302022-12-10T13:37:51+5:30
लहान-मोठे सगळ्यांनाच स्वप्नातून दचकून जागे होण्याचा त्रास होतो. त्यावर काही पारमार्थिक उपाय दिले आहेत ते करून बघा, लाभ होईल!
'झोप पूर्ण होत नाही' ही आज सर्व वयोगटातील लोकांची मोठी समस्या बनली आहे. उशीरा झोपून लवकर उठणे, मोबाईलचा अतिरिक्त वापर करणे, वेळी अवेळी झोपणे याव्यतिरिक्त आणखी एक कारण म्हणजे भरपूर स्वप्न पडणे. अनेक लोकांच्या बाबतीत ही गंभीर समस्या आहे, की त्यांना एखाद दुसरे स्वप्न नाही, तर एका पाठोपाठ स्वप्नांची मालिकाच दिसत राहते. त्यातील काही स्वप्ने आठवतात, काही झोपेतच विरून जातात, तर काही स्वप्नं दचकून जाग आणतात. यावर काही प्रभावी उपाय सांगितले जातात. तुम्हीदेखील ते अनुसरून पहा.
>>लहान बाळं किंवा लहान मुले तसेच मोठी माणसेसुद्धा झोपेतून दचकून जागी होतात. यावर उपाय म्हणून झोपताना उशाशी लाल कपड्यात तुरटी बांधून ठेवा.
>>कळत्या वयापासून मुलांकडून हनुमान चालिसा पाठ करून घ्या. जमल्यास झोपण्यापूर्वी सर्वांनी सामुहिकरित्या म्हणा.
>>झोपण्यापूर्वी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळा. कापराच्या वासाने खोलीतील आणि मनावरील तणाव कमी होऊन शांत झोप लागेल.
>>झोपताना दक्षिणेकडे किंवा पूर्व दिशेला पाय करू नका. तसेच खोलीच्या दरवाजाकडेही पाय करू नका. पूर्व विंâवा दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपा. त्यामुळे मन:शांति आणि समृद्धी मिळेल.
>>पाच शनिवार शनि मंदिरात जाऊन छाया दान करा. छाया दान म्हणजे तेलाच्या वाटीत आपल्या चेहऱ्याची प्रतिमा पाहून ती वाटी शनि मंदिरात दान करावी.
>>आपल्या झोपण्याच्या जागेवरून पाण्याने भरलेला नारळ ओवाळून काढावा आणि मंदिरात दान करावा.
>>आपल्या उशीखाली सुरी किंवा धारदार शस्त्र ठेवून झोपा.
>>काळी किंवा पांढरी चादर दान करा.
>>झोपण्याच्या दोन तास आधी जेवून घ्या. झोपण्यापूर्वी वज्रासन, भ्रामरी प्राणायाम नंतर शवासन करा. म्हणजे शांत झोप लागेल.
>>दर शनिवारी हनुमंताचे आणि शनि देवांचे दर्शन घ्या आणि झोपताना त्यांचे स्तोत्र म्हणा.