घरी आलेल्या व्यक्तींचे आदरातिथ्य केल्याने दैव उजळते, असे शास्त्र सांगते!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:48 PM2021-07-24T16:48:47+5:302021-07-24T16:49:06+5:30
कोण कोणत्या स्वरूपात, केव्हा तुमच्या दारात येईल, हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करा.
अतिथी देवो भव, अर्थात अतिथी हा देवाप्रमाणे असतो, असे मानणारी आपली हिंदू संस्कृती आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये दानधर्म व अतिथीधर्म या गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतीय परंपरा अशी आहे की, तुम्ही काय देता याला महत्त्व नाही, परंतु किती भक्तीभावनेने देता, हे ईश्वर पाहत असतो. व पुढे तुम्हाला अनंत हस्ते देत असतो. दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात किती दया उत्पन्न होते, हे तो पाहत असतो. अपंग, आंधळा किंवा गरजूंना पाहिल्यावर तुमच्या हृदयाला पाझर पुâटला पाहिजे व अशा लोकांना मनदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच आपण योग्य मार्गाव व परमार्थ करण्यास पात्र आहोत असे समजावे.
कोण कोणत्या स्वरूपात, केव्हा तुमच्या दारात येईल, हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करा. आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत. एकांताचा गैरफायदा घेणारे अनेक जण दारावर येतात. त्यांच्यापासून सतर्क राहिले पाहिजे. अशा ठिकाणी आदरातिथ्य करणे तुम्हाला अंगाशी येऊ शकते. परंतु, ओळखीच्या व्यक्तीला दिलेली नीट वागणूक किंवा रस्त्यावरील अनोळखी परंतु गरजवंताला केलेली अन्नधान्य किंवा आर्थिक मदत हे आतिथ्य धर्माच्या दृष्टीने योग्य ठरते.
काही लोकांना दानधर्म करावा अशी सद्बुद्धी होते. पण प्रत्यक्ष कृती होत नाही. कारण पैसा चांगल्या मार्गाने आलेला नसेल तर तो चांगली कृती घडू देत नाही. दान धर्मात आलेल्या वस्तूंचा लिलाव करू नये. त्याचा उपभोग घ्यावा नाहीतर गरजूंना वाटून द्याव्या, असे धर्मशास्त्र सांगते. तुम्हाला मोफत मिळालेली गोष्ट इतरांना मोफत द्या. त्याचे पैसे घेऊ नका. देण्यासाठी हात आखाडता घेऊ नका.
अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. जर खाण्याच्या वेळी कोणी आले, तर त्यालाही थोडे खायला द्या. गृहस्थाश्रमींकडून असे वागणे अपेक्षित आहे. आपल्या घरी आलेल्यांचे व्यवस्थित आदरातिथ्य करणे, व त्यांना संतुष्ट करणे दैव उजळण्यास हातभार लावते.