दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 09:16 AM2024-08-12T09:16:00+5:302024-08-12T09:17:17+5:30

Durva Ashtami Vrat On Second Shravan Mangalwar 2024 Durga Ashtami: श्रावण अष्टमीला दूर्वांचे व्रत केले जाते. अमरत्व प्राप्त झालेल्या दूर्वांना विशेष महत्त्व असते. दूर्वाष्टमीचे व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या...

second shravan mangalwar durva ashtami vrat 2024 date puja vidhi and importance of durva ashtami vrat on durga ashtami in shravan maas | दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता

दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता

Durva Ashtami Vrat On Second Shravan Mangalwar 2024 Durga Ashtami: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुसरा श्रावणी मंगळवार आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महात्म्य अनन्य साधारण असे आहे. धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रत-वैकल्ये, सण श्रावणात साजरे केले जातात. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात. यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे. याच दिवशी श्रावणात दूर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. दुर्गाष्टमी आणि दूर्वाष्टमी व्रतामुळे दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मराठी महिन्याच्या प्रत्येत शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते. हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते. या दिवशी देवीची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण केल्यास शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते. कारण श्रावणातील अष्टमीला दूर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. दूर्वांचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करणारे हे व्रत असल्याचे म्हटले जाते. श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. चतुर्थीपासून पुढे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश पूजनात दूर्वांना अनन्य साधारण महत्त्व असते. त्यामुळेच दूर्वा वृद्धी व्हावी, दूर्वांची जोपासना व्हावी, या उद्देशाने हे दूर्वाष्टमीचे व्रताचरण केले जात असावे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

दूर्वांची पूजा करताना शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात

समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दूर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले. त्यामुळे अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला, अशी कथा पुराणांमध्ये आढळते. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दूर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे, असे सांगितले जाते. दूर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात, असे आग्रहाने सांगितले जाते.

दूर्वांची प्रार्थना करावी, कथा श्रवण ठरले लाभदायी

दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे.

महादेव शिवशंकर, पार्वती देवी आणि गणपती बाप्पाची पूजा करावी

श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतुकालोद्भव फुले, फळे वाहावीत. धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. आरती करावी. पूजेच्या शेवटी 'त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।।' हा श्लोक म्हणावा. 

दूर्वा अन् शिवलिंगाचे पूजन 

अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. शिवपूजेत दूर्वा-रशमी तसेच अन्य फुले असणे आवश्यक आहे. शेवटी खोबरे, खजूर यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. स्वत: व्रतकर्त्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबातील सदस्य, आप्तेष्टमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना द्यावे, असे सांगितले जाते. अनेक भागात दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते.

 

Web Title: second shravan mangalwar durva ashtami vrat 2024 date puja vidhi and importance of durva ashtami vrat on durga ashtami in shravan maas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.