शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 11:56 AM2021-03-04T11:56:25+5:302021-03-04T11:56:49+5:30

५ मार्च रोजी गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि चरित्राचा आढावा.

Selected events in the character of Shri Gajanan Maharaj of Shegaon on the occasion of his revelation (first half) | शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

googlenewsNext

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा उद्या ५ अर्थात ५ मार्च रोजी प्रगटदिन आहे. त्यांच्या जीवन चरित्राचा कालखंड बत्तीस वर्षांचा आहे. या काळामधे महाराजांनी खूपच चमत्कार केले. 

श्री गजानन महाराज हे वऱ्हाडात शेगाव (शिवगाव) येथे होऊन गेले. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी ते प्रथमत: ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्या वेळी श्री गजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंदमहाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्यावेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याला चौपायात श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदी निमग्न होऊन निजले. तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. 

कीर्तन संपल्यावर गोविंद महाराज मंदिरात झोपले परंतु त्यांचे लक्ष घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज शांत कसा? त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले. तेव्हा गजानन माहाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले, की `हा साक्षात शिवअवतार आहे. त्याची उपेक्षा करू नका.' 

टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. `गण गण गणात बोते' बोटावरी वाजवून बोटे असे ते भजन अहर्निश गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले. ते वाटेल ते खात. कोठेही पडून राहत. कोठेही संचार करत. लोक त्यांना बहुमोल वस्त्र, अलंकार, पैसे, खाद्यपदार्थ अर्पण करत. पण ते सर्व तिथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मन:शांती मिळे. 

बंकटलाल अगरवाल हे गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन आले. एक अवतारी स्वामी अगरवालचे घरी येऊन राहिल्याची बातमी घरोघरी गेली. महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावातून लोक येऊ लागले. महाराजांचे चरण वंदून कोणी धन मागू लागले, पूत्र संतान मागू लागले, विद्या मागू लागले. त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले. महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होऊ लागले. 

शेगावीचे जानराव देशमुख मरणोन्मुख झाले होते. डॉक्टर, वैद्य अनेक केले. काही गुण येईना. शेवटी त्यांनी गजानन महाराजांचे चरणतीर्थ घेतले. ते बरे झाले. 

अकोल्यात भास्कर शेतकरी होता. शेतावर तो काम करी. महाराज भर दुपारी त्याच्याकडे पाणी मागण्यास आले. भास्कर शेतकरी रागाने म्हणाला, `सकाळी घडा भरून आणला आहे. तुम्हाला देऊन काय करू? चालते व्हा इथून!'

शेजारी कोरडी विहीर होती. त्याच्या काठावर महाराज बसले. महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहीरीत पाणी उत्पन्न केले. ते पाहून भास्कर शेतकNयाने क्षमा मागितली. त्या वेळेपासून तो महाराजांबरोबर शेगावी येऊन राहिला. 

गजानन महाराजांना कोणी रामावतार म्हणत, कोणी कृष्णावतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे समजत. त्यांच्या चरित्रातील आणखी काही भाग लेखाच्या उत्तरार्धात!

गण गण गणात बोते!

Web Title: Selected events in the character of Shri Gajanan Maharaj of Shegaon on the occasion of his revelation (first half)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.