Shakambhari Navaratri 2024: नवरात्रीच्या काळात लक्ष्मीचे वाहन घुबड दिसणे, हे तर शुभ लक्षण; अधिक वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:32 PM2024-01-19T13:32:52+5:302024-01-19T13:33:32+5:30

Shakambhari Navratri 2024: सध्या शाकंभरी नवरात्र सुरु आहे, त्यानिमित्ताने घुबडाचे दर्शन झाले तर शुभ वार्ता समजेल असे ज्योतिष शास्त्र सांगते; त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

Shakambhari Navaratri 2024: Seeing Lakshmi's vehicle owl during Navratri is an auspicious sign; Read more! | Shakambhari Navaratri 2024: नवरात्रीच्या काळात लक्ष्मीचे वाहन घुबड दिसणे, हे तर शुभ लक्षण; अधिक वाचा!

Shakambhari Navaratri 2024: नवरात्रीच्या काळात लक्ष्मीचे वाहन घुबड दिसणे, हे तर शुभ लक्षण; अधिक वाचा!

>> समीर सुनिल तुर्की, निसर्ग निरीक्षक, आळंदी 

घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही जण म्हणतात त्याचे दिसणे अशुभ लक्षण असते. मात्र या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन विचार केला असता घुबडाचे अस्तित्व मानवासाठी लाभदायकच ठरते, म्हणून त्याला अशुभ ठरवण्याची चूक करू नये. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

रहस्यमय असलेला हा पक्षी स्वतःच्या गुणांनी मात्र आई महालक्ष्मीचं वाहन अगदीच शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल, तसे तिचे वाहनही चंचल! ह्यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असते.

काही गुण जे आपण शिकले पाहिजेत

●हे कधीही विचलित होत नाही
●हे डिवचल्याशिवाय कोणावरही विनाकारण हल्ला करत नाही
●हे कोणालाच घाबरत नाही. उलटपक्षी ह्याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात.. अपवाद फक्त पक्षीराज गरुड.
●कोणी जर पाळले तर मालकावरच हल्ला केला आहे असं अपवादात्मक म्हणून सुद्धा उदाहरण सापडत नाही.

>> ज्या प्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं.. इतकं की हे उडतांना अजिबातच आवाज करत नाही.

>> ह्याची नजर इतकी तीक्ष्ण आणि भेदक की विचारता सोय नाही.. रात्री पाहण्याची ह्याची विलक्षण क्षमता ही तर ह्याची सर्वात ताकदीची बाजू. 

>> अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्सं करू शकतं. जर कोणी ह्याला शिकार करतांना पाहिलं असेल किंवा ह्याची शिकार करायची पद्धत माहिती असेल तर मी काय म्हणतोय ते सहज कळेल.

लक्षात ठेवण्यासारखं काही

>> घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावल्याएव्हढाच वाईट असू शकतो. कारण तो इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो.

>>  घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका, वरुन कुठून तरी घुबडं लक्ष ठेवून असतात आणि ती त्यांच्या पिल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत सजग असल्याने भयानक आक्रमक होऊ शकतात.

>> घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका तर फक्त लवकर दुसरीकडे पळून जा. 

>> आणि हो.. ह्याचा आवाज जरी ऐकू आला तरी उगाच अशुभ अशुभ म्हणून घाबरून जाऊ नका. काही अशुभ नसतं. थोडक्यात काय गैरसमजांपोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.

नुकतीच नवरात्र सुरू झालीआहे, त्यामुळे जैवविविधतील या दुर्मिळ घटकाला इजा पोहोचवू नका, उलट त्याच्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून पुण्यसंग्रह करा. 

Web Title: Shakambhari Navaratri 2024: Seeing Lakshmi's vehicle owl during Navratri is an auspicious sign; Read more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.