Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग-५

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:00 AM2024-01-22T07:00:00+5:302024-01-22T07:00:02+5:30

Shakambhari Navratri 2024: शाकंभरी नवरात्रीनिमित्त आपण महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा भावार्थ जाणून घेत तिची उपासना सुरु केली आहे, तिचा पुढचा भाग!

Shakambhari Navratri 2024: Mahishasur Mardini Stotra and Meaning; Shakambhari Navratri Upasana Part-5 | Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग-५

Shakambhari Navratri 2024: महिषासुर मर्दिनी स्तोत्र आणि भावार्थ; शाकंभरी नवरात्र उपासना भाग-५

>> रवींद्र गाडगीळ 

अविरल गण्ड गलन्मद मेदूर मत्त मतंग जरा जगते, 
त्रिभुवन भूषण भूत कलानिधी रूप पयोनिधी राजनुते | 
अयी सुदती जन लाल समान समोहन मन्मथ राजसुते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१३||

हे गजगामिनी तुझ्या चालीवर मोहित झालेले शिव, अशी संथ चाल तर प्रत्यक्ष गण्डस्थळावरुन मद वाहणार्‍या मदोन्मत्त गजराजलाही लाजवेल. कामदेवाला सुद्धा शृंगाराचे धडे देणारी तू रूपसुंदरी, तुझी सुंदर दंतपंक्ती तू हसतांना सर्वांना मोहित करते, साक्षात सागराची तू सौंदर्यवती कन्या आणि तुझा तो सागरपुत्र चंद्र सौंदर्यवान तुझाच भाऊ तो. त्यात तू त्रेलोक्यातले यच्चयावत अलंकार धारण केलेले, मग काय,सगळेच तुझ्यापुढे नतमस्तक होतात. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

कमलदलामल कोमल कांत कला कलितामल भाललते, 
सकल विलास कला निलय क्रमकेली चलत्कल हंसकले | 
अली कुल संकुल कुवलय मंडल मौलीमिलद्व कुललिकुले, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१४||

तुझे सौन्दर्य तू विविध पुष्पांनी आणखीनच खुलवले आहेस. कमलदलाप्रमाणे कमनियता, कोमलता, निर्मलता हे सर्व गुण तुझ्यात दिसत आहेत. सर्व कालगुणांना आश्रय देणारी तू कलानिपुण कलापूजकआहेस. मोठ्या आकर्षक जलाशयातील संथपणे विहार करणार्‍या हंसाच्या चालिसमान तुझे ते वागणे, बोलणे, चालणे, त्यात तू आज तुझ्या केशकलापावर सुगंधित पुष्पांनी सुशोभित जे केले आहेस,त्याच्या परिमलाने भुलून भ्रमर रुंजी घालत आहेत, तसे तुझे काळेभोर केस शिवाला आकार्शून घेत आहे. हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

कर मुरली रव वर्जित कुजित लज्जित कोकिल मंजुरुते, 
मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजीत शैल निकुञ्ज गते | 
निजगण भूत महा शबरी गण सद्गुण संभृत केलीरते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१५||

तू जेंव्हा तुझ्या मुरलीतून मधुर स्वर काढतेस, तेंव्हा गोड स्वर काढणारी कोकिळसुद्धा लाजून चूर होते, दर्खोऱ्यार्‍यातून जेंव्हा सहज विहार करतेस, जेथे निसर्गरम्य वातावरण असते,भ्रमर गुंजन करत असतात, सुंदर शांत असे ते मनोहारी दृश्य असते ते. तरी तुझ्या आसपास शाकिनी डाकिनी असे कैक गण फिरत असतात. हे  महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

आई जगदंबे, शाकंभरी देवी, आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद कायम ठेव,नमोस्तुते. पुढचे श्लोक उद्या बघूया. 

Web Title: Shakambhari Navratri 2024: Mahishasur Mardini Stotra and Meaning; Shakambhari Navratri Upasana Part-5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.