Shakambhari Navratri: शुक्रवारी आहे शाकंभरी नवरात्र समाप्ती; पारंपरिक आरती म्हणून देवीला देऊया निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:00 AM2023-01-05T07:00:00+5:302023-01-05T07:00:01+5:30

Shakambhari Navratri: ६ जानेवारी रोजी शुक्रवारी पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होत आहे, त्यानिमित्ताने ही विशेष आरती!

Shakambhari Navratri: Shakambhari Navratri ends on Friday; Let's bid farewell to the goddess as a traditional aarti! | Shakambhari Navratri: शुक्रवारी आहे शाकंभरी नवरात्र समाप्ती; पारंपरिक आरती म्हणून देवीला देऊया निरोप!

Shakambhari Navratri: शुक्रवारी आहे शाकंभरी नवरात्र समाप्ती; पारंपरिक आरती म्हणून देवीला देऊया निरोप!

googlenewsNext

शाकंभरी अर्थात फळ भाज्या देणारी देवी. एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ भाज्यांची निर्मिती केली होती. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा. तिच्या कृपेने आपल्या बळी राजाच्या हाताला यश येते आणि तो मातीतून अन्न धान्य पिकवतो आणि या दोहोंच्या कृपेने आपण दोन वेळचे सुग्रास भोजन करू शकतो. यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतो. या सोहळ्याचा शुक्रवारी अर्थात ६ जानेवारी रोजी अंतिम दिवस. यानिमित्त देवीला निरोप देताना आपण पारंपरिक आरती म्हणूया आणि तिच्या कृपेने कोणाही जीवाची उपासमार होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करूया. 

शाकंभरी देवीची मराठीत आरती 

शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली 
येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥
जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥

मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार 
शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥

अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण 
शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥

चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले 
नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥

पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात 
प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥

वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी 
अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥

शाकंभरी देवीची पारंपरिक आरती 

हरि ॐ श्री शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो
ऐसी अद्भुत रूप हृदय धर लीजो 
शताक्षी दयालु की आरती कीजो
तुम परिपूर्ण आदि भवानी मां, सब घट तुम आप बखानी मां
शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो
 
तुम्हीं हो शाकुम्भर, तुम ही हो सताक्षी मां
शिवमूर्ति माया प्रकाशी मां,
शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो
 
नित जो नर-नारी अम्बे आरती गावे मां
इच्छा पूर्ण कीजो, शाकुम्भर दर्शन पावे मां
शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो
 
जो नर आरती पढ़े पढ़ावे मां, जो नर आरती सुनावे मां
बस बैकुंठ शाकुम्भर दर्शन पावे
शाकुम्भरी अंबाजी की आरती कीजो। 

Web Title: Shakambhari Navratri: Shakambhari Navratri ends on Friday; Let's bid farewell to the goddess as a traditional aarti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.