Shani Amavasya 2023: शनी देवाला घरच्या देव्हाऱ्यात स्थान का नाही? त्यांच्यासमोर उभे राहून पूजा करू नये असे का म्हणतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 02:27 PM2023-01-21T14:27:13+5:302023-01-21T14:28:30+5:30

Shani Amavasya 2023: आज शनी अमावस्या आहे, त्यानिमित्त शनी देवाची पूजा आपण करूच, पण ती देवळात जाऊनच का? घरी का नाही? वाचा त्याचे उत्तर!

Shani Amavasya 2023: Why Shani Deva has no place in home temple? Why is it said not to stand and worship in front of them? Find out! | Shani Amavasya 2023: शनी देवाला घरच्या देव्हाऱ्यात स्थान का नाही? त्यांच्यासमोर उभे राहून पूजा करू नये असे का म्हणतात? जाणून घ्या!

Shani Amavasya 2023: शनी देवाला घरच्या देव्हाऱ्यात स्थान का नाही? त्यांच्यासमोर उभे राहून पूजा करू नये असे का म्हणतात? जाणून घ्या!

googlenewsNext

शनी देवांचे नुसते नाव काढले, तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते. बरोबर आहे, शालेय वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचीच सर्वात जास्त भीती वाटत आली आहे. ही भीती आदरयुक्त भीती असते. कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा देतात. त्याचप्रमाणे शनी देव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत. म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते. साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे, म्हणून हर तऱ्हेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांच्यावर शनी देव प्रसन्न देखील होतात. 

सूर्यपुत्र मानला गेलेल्या शनीला अन्य देवतांप्रमाणे पूजले जाते. शनीची अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक असून, याचे पठण, नामस्मरण, जप केले जातात. शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करत असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून शनीची साडेसाती, ढिय्या प्रभाव तसेच महादशा सुरू असलेल्यांना शनी पूजन, नामस्मरण, उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शनीदेवाची मूर्ती, तसबीर, प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही. घरात अन्य देवांची प्रतिमा, मूर्ती असून सुद्धा शनी देवांची प्रतिमा निषिद्ध का? याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितले जाते. 

शनी देवाला मिळाला होता शाप : 

पौराणिक कथा असे सांगते, की शनी देवांना शाप मिळाला होता, की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याचा विनाश होईल. म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते. शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे, त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते, अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील. शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा, वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते. या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य नाही. म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवली जाते. 

कसे घ्यावे शनी देवाचे दर्शन?

शनीदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये. तर, शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे. शनीदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. गरीब, असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

Web Title: Shani Amavasya 2023: Why Shani Deva has no place in home temple? Why is it said not to stand and worship in front of them? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.