Shani Dev: शनी, श्वास आणि प्राणायाम यांचा घनिष्ट संबंध आहे; साडेसातीचे अरिष्ट टाळण्यासाठी पूर्ण माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:20 PM2022-09-30T14:20:12+5:302022-09-30T14:23:13+5:30

Shani Sadesati: योग शास्त्र हे अध्यात्माचे द्वार आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आयुष्यातील सर्वात कठीण काळ, साडेसातीचा; तोही योगाभ्यासाने सुकर होतो!

Shani Dev: Shani, breath and pranayama are closely related; Read the complete information to avoid the scourge of half past seven! | Shani Dev: शनी, श्वास आणि प्राणायाम यांचा घनिष्ट संबंध आहे; साडेसातीचे अरिष्ट टाळण्यासाठी पूर्ण माहिती वाचा!

Shani Dev: शनी, श्वास आणि प्राणायाम यांचा घनिष्ट संबंध आहे; साडेसातीचे अरिष्ट टाळण्यासाठी पूर्ण माहिती वाचा!

Next

>> ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित 

आपल्या अज्ञानाने आपण शनीला आपला शत्रू समजतो पण तो आपला खरा सोबती सखा मित्र आहे. आयुष्यात आपले निंदक म्हणजेच आपले टीकाकार हे आपले खरे मित्र असतात . शनी आपले काम चोख बजावत असतो त्यात कुणाचीही हयगय नाही. साडेसातीत आपले आयुष्य खऱ्या अर्थाने फुलते कारण असंख्य चढ उतारांमुळे आपल्याला आपली ओळख नव्याने होत जाते . आयुष्य म्हणजे काय आणि ते कसे जगावे ह्याचे सगळे धडे शनी आपल्याकडून साडेसाती मधेच गिरवून घेतो.

जसा घरात आपल्याला कुणाचा तरी धाक हवाच ...तसाच आयुष्यात शानिचाही आहे हे मान्य ,कारण तोच आपल्या आयुष्याला लगाम घालू शकतो. बुधाची मंगळा ची साडेसाती नसते पण शनीची साडेसाती आली की झोप उडते. साडेसाती आली कि आपण जो सांगेल ते उपाय करायला लागतो. का? कश्यासाठी इतकी भीती ? हि भीती सर्वाधिक अश्याच व्यक्तीना असते ज्यांना बरोबर आपण केलेल्या दुष्कृत्यांची, चुकांची आणि अक्षम्य कृत्यांची जाणीव असते .त्यांना आता आपला पापाचा घडा भरलाय आणि आता शनिदेव दंड देणार ह्याची पुरेपूर जाणीव होते आणि म्हणूनच मग मंगळवार शनिवार उपवास पूजा , मारुतीला तेल अर्पण करा , हे करा आणि ते करा सर्व चालू होते. पण ज्याने ह्यातील काहीच केले नाही किंवा जो आनंदाने निर्लेपपणाने खरेपणाने आपले जीवन व्यतीत करत आहे तो निजानंदी आपल्याच विश्वात रमलेला असतो आणि जीवनाचा प्रवास करत राहतो. आपल्या सद्गुरूंच्या सेवेमुळे त्याच्या दुःखाचे परिमार्जन कधी होते ते त्याला समजत सुद्धा नाही .असो 

तर सांगायचे असे कि साडेसाती मध्ये उपायांची अगदी खैरात होते . प्रत्येक जण काहीना काही उपाय करत राहतात . आपल्यावर संकटांची मालिका बरसणार ह्याची जणू त्यांना खात्रीच असते. पण ह्या सर्वापेक्षाही संकट येवूच नये ह्यासाठी आपले कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे .

एखाद्या मुलाला अचानक मार्क कमी मिळू लागले किंवा त्याचे अभ्यासात लक्ष्य उडाले तर आपण काय करतो ? काय करणे गरजेचे आहे? तर त्याच्या ह्या वागण्याचे मुळ शोधून काढणे आवश्यक आहे . मग ते काहीही असो . शाळेत कुणी त्याला त्रास देत आहे का? कुणी खेळायला घेत नाहीय का? त्याला एकटे पाडत आहेत का? घराच्या कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होतो आहे का? कि खरच त्याला अभ्यासात काही अडचणी येत आहेत का? अश्या विविश प्रश्नांची उत्तरे आपल्याला समस्येच्या मुळाशी नेतील . अगदी तसेच शनीला समजून घेतले ,त्या ग्रहाचे कारकत्व , त्याचा स्वभाव , पिंड त्याला काय अभिप्रेत आहे हे समजून घेतले तर साडेसातीच काय संपूर्ण आयुष्य सुकर होयील.

शनी हा वायूतत्वाचा ग्रह आहे. निरस आहे संथ आहे , प्रत्येक गोष्टीत विलंब लावून आपला संयम शिकवणारा आहे . आपल्या शरीरात पंचतत्वांचा अविष्कार आहे . कुठलेही तत्व असंतुलित झाले तर शरीर नामक यंत्र बिघडते आणि आजारपण येते . शनी हा वायूतत्व दर्शवतो . आपल्या शरीरातील हाडे तसेच खालच्या भागांवर प्रामुख्याने त्याचे नियंत्रण आहे . आपण खाल्लेले अन्न हे पोटापर्यंत नेण्याचे काम शरीरातील वायू करतो तसेच प्रत्येक अवयवाची हालचाल सुद्धा वायू नियंत्रित करतो म्हणूनच वायू तत्व बिघडले तर शरीराचा एखादा भाग जसे हात पाय वाकडे होणे , डोळा तिरळा होणे किंवा मलमुत्र विसर्जन संस्था बिघडणे पोट बिघडणे , अर्धांगवायू , अस्थमा , श्वसनाचे आजार होणे ह्या सारखी आजारांना आपल्या सामोरे जावे लागते .

ह्या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे “ प्राणायाम “ . प्राणायाम म्हणजेच “शनी आणि शनी म्हणजेच प्राण ,कारण शेवटचे श्वासाचे बटण तोच दाबणार आहे . आपण कितीही टिमक्या वाजवल्या तरी आपण किती श्वास घेणार हे त्याच्याच तर हाती आहे. आपल्या मनाच्या अवस्थेचा सुद्धा श्वासाचा गतीवर परिणाम निश्चित होतो. नियमित प्राणायाम करून शरीरातील वायू तत्व कंट्रोल करता येते . एकदा ते व्यवस्थित झाले तर वरती उल्लेख केलेल्या अनेक आजारांना तिलांजली मिळेल.

प्राणायाम करताना शरीराची श्वसनाची लयबद्ध हालचाल होत असते. मनाची शांतता जीवन समृद्ध करते , विचार अधिक आणि बोलणे कमी होते त्यामुळे अविचाराने केल्या जाणाऱ्या अनेक कृतींवर बंधने येतात . थोडक्यात माणूस निर्णयक्षम होतो, आपली कर्मे सुधारतात आणि शनिदेव आपले मित्र होतात . अजून काय हवे ? शरीरात प्राणवायू व्यवस्थित खेळता राहिला तर श्वसन क्रिया आणि पचनसंस्था सुधारते. मनाचे आणि शरीराचे शुद्धीकरण होऊन संपूर्ण शरीराचे संतुलन राहते. गेल्या काही वर्षातील करोना काळ पाहिला तर फुफुसाचे कार्य व्यवस्थित असणे किती आवश्यक आहे ते समजेल. 

प्राणायाम केल्याने मनाला एकप्रकारे निस्सीम शांतता अनुभवता येते त्यामुळे योग्य दिशेने विचारचक्रे धावतात , चिडचिड कमी होते. ज्या लोकांना सतत कुठल्याही कारणाने लगेच रागावण्याची सवय आहे त्यांनी नक्कीच प्राणायामाचा अनुभव घ्यावा. 

शनी आणि श्वास ह्याचा किती घनिष्ठ संबंध आहे आणि तो सुरळीत राहण्यासाठी  प्राणायाम हा लाख मोलाचा सहज सोपा प्रत्येकाला घरी कुठलेही पैसे खर्च न करता येण्यासारखा उपाय आहे हे विषद करण्यासाठी हा लेखनप्रपंच .
ओं शं शनैश्चराय नमः 

संपर्क    : 8104639230

 

Web Title: Shani Dev: Shani, breath and pranayama are closely related; Read the complete information to avoid the scourge of half past seven!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.