Shani Guru Position 2023 : 30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी होतोय दुर्लभ संयोग, शनि-गुरु निर्माण करणार खास योग; पडेल पैशाचा पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:30 PM2023-02-28T18:30:02+5:302023-02-28T18:33:57+5:30
ग्रहांची ही शुभ आणि अद्भुत स्थिती दुर्लभ योग तयार करत आहे. याचा सर्व राशींवर मोठा परिणाम होईल...
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाते. यावर्षी 7 मार्चला होलिका दहन केले जाईल आणि 8 मार्चला होळी खेळली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही दिवशी ग्रहांची स्थिती विशेष असेल, यामुळे अद्भुत संयोग निर्माण होईल.
शनि-सूर्य आणि बुध बनवणार त्रिग्रही योग -
यावेळी शनिच्या कुंभ राशीत शनि-सूर्य आणि बुध यांची युती होत आहे. या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग बनत आहे. असा योग तब्बल 30 वर्षांनंतर बनत आहे. यापूर्वी 1993 मध्ये होलिका दहनाच्यादिवशीच हे तिन्ही ग्रह कुंभ राशीत होते. याशिवाय गुरु देखील स्वराशीत अर्थात मीन राशीत आहेत. असे 12 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी होळीच्या वेळीच 2011 मध्ये गुरु मीन राशीत होते. अशा प्रकारे ग्रहांची ही शुभ आणि अद्भुत स्थिती दुर्लभ योग तयार करत आहे. याचा सर्व राशींवर मोठा परिणाम होईल.
याशिवाय कुंभ राशीत सूर्य आणि बुध यांची युती बुधादित्य राजयोग तयार करत आहे. ज्योतिष शास्त्रात बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला गेला आहे. यावेळी हा योग वृषभ, शुक्र आणि कुंभ राशीला शुभ फळ देईल.
शुक्राचाही मोठा प्रभाव असेल -
एवढेच नाही, तर धन-विलास आणि प्रेम-रोमान्स दाता शुक्र ग्रहही सध्या मीन राशीत आहेत. गुरु भाग्य वृद्धि करवणारा ग्रह आहे. हे दोन्ही शुभ ग्रह आपल्या उच्च राशीतत असल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि प्रेम वाढवतील. शुक्राचे मीन राशीत असणे आणि गुरुसोबत युती करणए प्रामुख्याने वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांना शुभ फळ देईल.