Shani Jayanti 2022: आज शनी जयंती निमित्त सर्व राशीच्या जातकांनी दुपारी २-५ वेळेत करा 'ही' शनी उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:23 PM2022-05-30T12:23:26+5:302022-05-30T12:27:40+5:30
Shani Jayanti 2022: मनःशांती, सुयश, रोगमुक्ती, संरक्षण आणि लाभासाठी ही साधना आहे ती अवश्य करा.
आज श्रीशनि जयंती आहे. यानिमित्ताने शनी उपासना कशी करावी यासंदर्भात पालघर येथील ज्योतिष, वास्तू मार्गदर्शक सचिन मधुकर परांजपे यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. त्यांच्याअनुसार दुपारचा काळ उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याकाळात काय केले पाहिजे हे त्यांच्या शब्दात जाणून घेऊ.
शनि महाराज हे कट्टर शिवभक्त असल्याने सोमवारच्या वैशाख अमावस्या म्हणजे शनि जयंतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः मकर, कुंभ आणि मीन या साडेसाती सुरु असलेल्या आणि कर्क व वृश्चिक या अडीचक्री सुरु असलेल्या राशीच्या मंडळींनी हा दिवस शनि साधनेसाठी राखून ठेवावा. त्याचप्रमाणे इतर सर्व लोकांनी, सर्व राशीच्या स्त्रीपुरूषांनीही पुढील साधना आवर्जून करावी.
या दिवशी सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुसरे दिवशी मंगळवारी सूर्योदयापर्यंत कोणत्याही प्रकारे मांसाहार, मद्यपान, अंडी, नशेचे पदार्थ अजिबात सेवन करु नये. उपवास करायची आवश्यकता नाही, एकवेळ केला तर उत्तमच. या दिवशी कायावाचामानसे ब्रह्मचर्यव्रत पालन करावे. या दिवशी जुगार आणि भांडण वादविवाद टाळणे. ही बंधने या पर्वणी पुढील नैमित्तिक साधना करणाऱ्यांसाठी बंधनकारक आहेत.
सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून, तुमची दैनंदिन पूजाअर्चा, वाचन वगैरे करावे. सकाळी ९ ते ११ या कालावधीत शिवालयात जाऊन पिंडीचे प्रार्थनापूर्वक दर्शन घ्यावे. पिंडीवर शुध्द जल आणि पंचामृत अभिषेक करुन बेल आणि पांढरी फुले अर्पण करावी. थोडावेळ ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करुन देवळातून घरी यावे. घरी क्षणभर बसून पायधूळ झाडून तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यानंतर तुमची दैनंदिन कामे वगैरे करुन, जेवण विश्रांती वगैरे करुन दुपारी २.१५ ते संध्याकाळी ५ या कालावधीत खालील श्रीशनिकवचाचे जितके शक्य होतील तितके पाठ करावेत.
हे पाठ पश्चिम दिशेला तोंड करून मग करावेत. देवासमोर बसूनच करायला हवेत असं नाही. बेडरुममधे नकोत. खाली चटई घालून बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून करा. शक्यतो पाठ सुरु असताना मधेच बोलणे, खाणाखुणा करणे, मोबाईल वगैरे टाळावे. मधे उठून थांबून येरझारे करु शकता. चहा कॉफी पाणी पिऊ शकता. या पावणेतीन तासात किमान २१ पाठ होणे क्रमप्राप्त आहे. अधिक झाल्यास उत्तम. स्त्रीची मासिक पाळी, सोयरसुतक असेल तर मनाने नुसता नमस्कार करा. ही साधना करु नये.
कालमानसापेक्ष ज्या देशात जेव्हा ३० मे सोमवार येईल तेव्हा तेव्हा हेच फॉलो करुन याच वेळी साधना करावी. उच्चार कठीण वाटले तर युट्यूबवर शनिवज्रपंजरकवच सर्च करुन उच्चारण ऐका. काय वाट्टेल ते करा पण साधना त्या पर्वणीकाळात कराच. मनःशांती, सुयश, रोगमुक्ती, संरक्षण आणि लाभासाठी ही साधना आहे ती अवश्य करा.
श्रीशनिवज्रपंञ्जरकवच
श्री गणेशाय नमः ॥
विनियोगः ।
ॐ अस्य श्रीशनैश्चरवज्रपञ्जर कवचस्य कश्यप ऋषिः,
अनुष्टुप् छन्दः, श्री शनैश्चर देवता,
श्रीशनैश्चर प्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
ऋष्यादि न्यासः ।
श्रीकश्यप ऋषयेनमः शिरसि ।
अनुष्टुप् छन्दसे नमः मुखे ।
श्रीशनैश्चर देवतायै नमः हृदि ।
श्रीशनैश्चरप्रीत्यर्थे जपे विनियोगाय नमः सर्वाङ्गे ॥
ध्यानम् ।
नीलाम्बरो नीलवपुः किरीटी गृध्रस्थितस्त्रासकरो धनुष्मान् ।
चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद् वरदः प्रशान्तः ॥ १॥
ब्रह्मा उवाच ॥
शृणुध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत् ।
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् ॥ २॥
कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम् ।
शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् ॥ ३॥
ॐ श्रीशनैश्चरः पातु भालं मे सूर्यनन्दनः ।
नेत्रे छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानुजः ॥ ४॥
नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा ।
स्निग्धकण्ठश्च मे कण्ठं भुजौ पातु महाभुजः ॥ ५॥
स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु-शुभप्रदः ।
वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्तथा ॥ ६॥
नाभिं ग्रहपतिः पातु मन्दः पातु कटिं तथा ।
ऊरू ममान्तकः पातु यमो जानुयुगं तथा ॥ ७॥
पादौ मन्दगतिः पातु सर्वांगं पातु पिप्पलः ।
अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दनः ॥ ८॥
इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य यः ।
न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः ॥ ९॥
व्यय-जन्म-द्वितीयस्थो मृत्युस्थानगतोऽपि वा ।
कलत्रस्थो गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनिः ॥ १०॥
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे ।
कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित् ॥ ११॥
इत्येतत्कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा ।
द्वादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशयते सदा ।
जन्मलग्नस्थितान् दोषान् सर्वान्नाशयते प्रभुः ॥ १२॥
॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे ब्रह्म-नारदसंवादे
शनिवज्रपंजरकवचं सम्पूर्णम् ॥