Shani Pradosh 2023: आज सूर्यास्ताच्या वेळी शनी देव आणि महादेव यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी 'हे' दोन सोपे मंत्र म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 03:32 PM2023-02-18T15:32:33+5:302023-02-18T15:34:19+5:30

Shani Pradosh 2023: आज शनी प्रदोष आणि महाशिवरात्री, या औचित्याने शनिदेव आणि महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिलेले दोन सोपे मंत्र म्हणा. 

Shani Pradosh 2023: Chant these two simple mantras at sunset today to merit the grace of Shani Dev and Mahadev! | Shani Pradosh 2023: आज सूर्यास्ताच्या वेळी शनी देव आणि महादेव यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी 'हे' दोन सोपे मंत्र म्हणा!

Shani Pradosh 2023: आज सूर्यास्ताच्या वेळी शनी देव आणि महादेव यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी 'हे' दोन सोपे मंत्र म्हणा!

googlenewsNext

आज महाशिवरात्री, अर्थात भगवान महादेवाच्या उपासनेचा दिवस आणि रात्रसुद्धा! आजच्या दिवशी शंकराची उपासना करून ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करा आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रदोष मुहूर्त असल्याने आणि तो शनिवारी आल्याने शनी स्तोत्र म्हणा. ते स्तोत्र आणि त्याचे लाभ पुढीलप्रमाणे-

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।
नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।

नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।
नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते। 

नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।
नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते। 

नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:।
नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने। 

नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च। 

अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।
नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते। 

तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।
नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:। 

ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे।
तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्। 

देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:।
त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:। 

प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे।
एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।

शनी स्तोत्राचे पठण केल्याने होणारा लाभ :

अशा या स्तोत्राचे पठण जो करेल, मग तो मनुष्य असो, देव असो वा राक्षस, सिद्ध आणि विद्वान असो, त्याला शनिदेवामुळे कोणताही अडथळा येणार नाही. ज्यांच्या महादशा किंवा अंतरदशा, संक्रमण किंवा आरोही, द्वितीय, चतुर्थ, आठव्या किंवा बाराव्या स्थानात शनि असेल त्यांनी शुद्ध होऊन या स्तोत्राचा सकाळी, मध्यान्ह आणि संध्याकाळी तीन वेळा पठण केल्यास त्यांना शनीची कृपादृष्टी प्राप्त होईल. 

Web Title: Shani Pradosh 2023: Chant these two simple mantras at sunset today to merit the grace of Shani Dev and Mahadev!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.