Shani Sadesati 2023: शिव शंभुचे रुद्राक्ष करेल शनीच्या साडेसातीपासून रक्षण; त्याचा वापर कधी व कसा करतात ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:00 AM2023-01-30T07:00:00+5:302023-01-30T07:00:02+5:30
Shani Sadesati 2023: शनी आणि रुद्राक्षाचा संबंध जाणून घ्या आणि ज्योतिषांच्या मार्गदर्शनाने त्याचा वापर करा, लाभ होईल!
रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रह नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडादेखील शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. असे मानले जाते की रुद्राक्षाची शक्ती अशी आहे की जो त्याचा योग्य वापर करतो तो सर्व प्रकारच्या संकटांवर मात करतो. मात्र जर कोणी नियमांशिवाय ते परिधान केले तर त्याचा विपरीत परिणाम होतो. याशिवाय नियमानुसार रुद्राक्ष धारण केल्यास शनीच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
रुद्राक्ष आणि शनीचा संबंध : धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. अनादी काळापासून भगवान शंकर अलंकार म्हणून रुद्राक्ष परिधान करतात. तसेच रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रहस्थितीवर नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते.याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. नियमानुसार ते परिधान केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
शनीसाठी रुद्राक्षाचा वापर : शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राक्षाचा नियमित वापर करावा. मात्र त्याचे नियम आधी जाणून घ्यावेत. जसे की- नोकरी-रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. एकाच वेळेस ३ दहा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे अधिक फायदेशीर ठरते. हा रुद्राक्ष शनिवारी लाल धाग्यात घालून गळ्यात घाला. याउलट कुंडलीत शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते टाळण्यासाठी एक मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे शुभ मानले जाते. १ एक मुखी आणि २ अकरा मुखी रुद्राक्ष यांना लाल धाग्याने एकत्र बांधून धारण करा.
साडेसाती सुरु असताना रुद्राक्षाचा वापर: आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी गळ्यात ८ मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. तसेच पंचमुखी रुद्राक्ष वापरणेही लाभदायक ठरते. रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी शनि आणि शिवाच्या मंत्रांचा जप करणे शुभ असते. रुद्राक्ष प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतेच असे नाही. त्यासाठी आपले ग्रहबळ देखील चांगले असावे लागते. यासाठीच रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेण्याची सूचना केली जाते.