नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:17 PM2024-10-03T14:17:04+5:302024-10-03T14:17:55+5:30

Shardiya Navratri 2024 Saptashloki Durga Stotra: हे केवळ एकच स्तोत्र म्हटल्याने अनेकविध लाभ आणि शुभ पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.

shardiya navratri 2024 recite chant effective saptashloki durga stotra and get blessings of durga devi in navratri utsav 2024 saptashloki durga stotram in marathi | नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

Shardiya Navratri 2024 Saptashloki Durga Stotra: नवरात्र सुरू झाले आहे. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. या संपूर्ण नऊ दिवसांत आपापल्या परिने देवीची सेवा, उपासना, पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप केले जाते. तसेच हजारो घरांमध्ये आपापले कुळाचार, कुळधर्म, रितीरिवाज, परंपरा यांचे पालन करून देवीची करुणा भाकली जाते. दुर्गा देवीची स्तोत्रे, मंत्र यांमध्ये दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाची मानली जाते. देवी उपासनेला फार मोठी परंपरा असून ती प्राचीन काळापासून केली जाते. तिची आराधना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच केली जाते. 

भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून ‘दुर्गा सप्तशती’ची सर्वदूर ख्याती आहे. शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीयय ग्रंथ आहे. सर्व पुराणात ‘मार्कंडेय पुराण’ प्राचीन मानले जाते व ‘दुर्गा सप्तशती’ त्यातील अंश आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी तितका वेळ देणे शक्य होत नाही. आधुनिक काळातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आपले स्थान बळकट करताना दिसतात. अशावेळी घरातील कामे, ऑफिस, मुले-कुटुंब, स्वयंपाक, घरच्या आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्या निभावताना तारेवरची कसरत दररोज करावी लागते. अशावेळी केवळ ५ मिनिटांत होणारे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हटले, तर संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य मिळते आणि अनेकविध लाभही प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. हे स्तोत्र म्हणजे सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रम्

सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र

॥ अथ सप्तश्लोकी दुर्गा ॥

शिव उवाच:

देवि त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी ।
कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं ब्रूहि यत्नतः ॥

देव्युवाच:

शृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् ।
मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ॥

विनियोग:

ॐ अस्य श्री दुर्गासप्तश्लोकीस्तोत्रमन्त्रस्य नारायण ऋषिः, अनुष्टुप छन्दः, श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यो देवताः, श्रीदुर्गाप्रीत्यर्थं सप्तश्लोकीदुर्गापाठे विनियोगः ।

ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हिसा ।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥१॥

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः
स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्‌यदुःखभयहारिणि त्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॥२॥

सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥३॥

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तुते ॥४॥

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ॥५॥

रोगानशोषानपहंसि तुष्टा रूष्टा
तु कामान्‌ सकलानभीष्टान्‌ ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां
त्वामाश्रिता ह्माश्रयतां प्रयान्ति ॥६॥

सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्र्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्यद्वैरिविनाशनम्‌ ॥७॥

॥ इति श्रीसप्तश्लोकी दुर्गा संपूर्णम्‌ ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: shardiya navratri 2024 recite chant effective saptashloki durga stotra and get blessings of durga devi in navratri utsav 2024 saptashloki durga stotram in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.