Shiv Upasna: आज दिवसभरात 'अशी' शिवपूजा केलीत तर संपूर्ण वर्ष सुखात जाईल! - सद्गुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:28 AM2024-01-01T10:28:28+5:302024-01-01T10:29:01+5:30

New Year 2024: २०२४ ची सुरुवात सोमवारी झाल्यामुळे आज दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा सद्गुरूंनी सांगितल्यानुसार शिवपूजा करा आणि वर्षभर लाभ मिळवा!

Shiv Upasna: If you do Shiv Upasna today during the day, the whole year will be happy! - Sadhguru | Shiv Upasna: आज दिवसभरात 'अशी' शिवपूजा केलीत तर संपूर्ण वर्ष सुखात जाईल! - सद्गुरु 

Shiv Upasna: आज दिवसभरात 'अशी' शिवपूजा केलीत तर संपूर्ण वर्ष सुखात जाईल! - सद्गुरु 

२०२४ ची सुरुवात सोमवारी झाल्यामुळे अनेकांनी सकाळीच शिवदर्शनासाठी मंदिरात रांग लावली, पण अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टीअभावी इच्छा असूनही दर्शनाला जाता आले नाही, त्यांनी काळजी करू नका. आज दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घराच्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या शिवलिंगाची सद्गुरूंनी सांगितल्यानुसार पूजा करा, शिवकृपेने पूर्ण वर्ष आनंदात जाईल अशी सद्गुरू हमी देतात. 

सोमवार महादेवाचा, हे आपण जाणतोच! त्यात आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. सुट्टी न मिळाल्याचे दुःख अनेकांना असेलच, पण ज्यांना कामाला जावे लागले त्यांनी नाराज न होता, शिवकृपेने नवीन वर्षांची सुरुवात कामाने, मेहनतीने, सचोटीने करायला मिळतेय याचा आनंद माना. अशातच शिवउपासनेची जोड कशी देता येईल तेही जाणून घ्या. 

सोमवारी शिवपूजा करणे शुभ मानले जाते. पण ही पूजा कशी असावी? तर सद्गुरू सांगतात, 'शक्यतो शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे. घरून नेलेल्या पेलाभर पाण्याचा, तसेच दूध, दही, तूप, मध यासारख्या स्निग्ध पदार्थाचा अभिषेक करावा. थोडेसे कोमट पाणी घालावे. चंदन किंवा भस्मलेपन करावे आणि पांढरे किंवा लाल फुल वाहावे. मात्र बिल्वपत्र अर्थात बेलाचे पण वाहायला विसरू नये. कारण बाकी उपचार राहिले, तरी बेलाचे पान महादेवाला प्रिय असल्यामुळे ते जरूर अर्पण करावे.' 

ऑफिस किंवा इतर कामांमुळे ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेणे, अभिषेक करणे शक्य नाही, त्यांनी घरातल्या देव्हाऱ्यातील शिवपिंडीवर ओम नमः शिवाय १०८ वेळा म्हणत अभिषेक करावा. बेल पत्र आठवणीने वाहावे. महादेवाचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उपासनेने करावी. 

शिव उपासनेचे महत्त्व :

शिव ही शांत तेवढीच संहार करणारी देवता आहे. त्यांना देवाधिदेव महादेव म्हटले जाते. यमराज देखील शिव उपासनेपुढे नतमस्तक होतात. तसेच शिव उपासनेत सातत्य ठेवले असता, आपला व्याप, ताप, नैराश्य, तणाव, कलह या सर्व त्रासदायक गोष्टींमधून सुटका होते. मात्र त्यासाठी उपासना रोज केली पाहिजे. 

शिव उपासनेची योग्य वेळ : 

अंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून किमान दहा मिनिट शांत बसावे. ओम नमः शिवाय या शिव नामाचा जप करावा. त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. ही उपासना एखाद दिवस करून फळ येत नाही, ती रोज करावी लागते, तेव्हा कुठे त्या उपासनेची प्रचिती येऊ लागते. ज्यांची सकाळी कामाची गडबड असते, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी ही उपासना करावी. मात्र उपासना झाल्यावर कोणाशीही न बोलता, मोबाईल, टीव्ही न बघता त्या शिव उपासनेत रत होऊन झोपी जावे. कोणतीही उपासना सहा महिने सातत्याने केली की त्याचे फळ दिसू लागते. म्हणून सद्गुरूंनीदेखील वर्षाच्या सुरुवातीला सुचवलेली शिव उपासना भक्तांनी रोज जाणीवपूर्वक करावी, मग आश्चर्य पहा... नवीन वर्षांचा पहिला दिवसच काय, तर पूर्ण वर्षच आनंदात जाईल!

Web Title: Shiv Upasna: If you do Shiv Upasna today during the day, the whole year will be happy! - Sadhguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.