Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:00 PM2021-07-30T12:00:23+5:302021-07-30T12:00:53+5:30

Shravan 2021 : या चार महिन्यात एका पाठोपाठ एक येणारे सण पाहता मुख्यत्वे पुढील देवांची पूजा केली जाते. 

Shravan 2021 : Let's see which gods to worship in four months including Shravan | Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया!

Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया!

Next

आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणतो व कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतो. याचाच अर्थ चार महिने देव झोपतात असे आपण म्हणतो. देवाच्या झोपेचे चार महिने आपण मंगलकार्य वगळता सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो. तो काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिक मासात देव उठले की नंतर मंगलकार्याला सुरुवात होते. या चार महिन्यांच्या काळात सृष्टीचा भार श्री विष्णू भगवान महादेवांच्या हाती सुपूर्द करून विश्रांती करतात असे मानले जाते, त्यामुळे चतुर्मासात महादेवाच्या पूजेला अधिक महत्त्व दिले जाते. 

आपल्या सनातन धर्माने अत्यंत विचारपूर्वक देश-काल-स्थिती सांभाळून या गोष्टींची आखणी केली आहे व त्याचा संबंध धर्म तसेच ईश्वराशी जोडला आहे. धर्म व्यवस्था ही आपल्या सुरक्षिततेसाठी, विकासासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली रचना असते. त्यानुसार नियमांचे पालन करून आपले आयुष्य सुकर व्हावे, एवढाच त्यामागील हेतू असतो. 

आषाढात पावसाचे आगमन होते. पृथ्वी हरीत होते. सृजनतेचा सोहळा रंगतो. धान्य रुजते. पिक फोफावते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यामुळे या चार महिन्यात मनुष्याला आपली उणीव भासणार नाही, अशी देवानेच व्यवस्था लावून दिलेली असते. अशी व्यवस्था लावून देत पुढील चार महिने सृष्टीचा कारभार तू आपल्या हाती घे आणि नवनिर्मितीचा आनंद घे असे म्हणत परमेश्वर मनुष्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकतो. काही अडीअडचण आली तर तो आहेच, परंतु त्याच्या अनुपस्थितीत आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकू हा त्याला विश्वासही आहे. तो विश्वास सार्थ ठरवून भक्ताने चातुर्मासात देवाला स्मरून प्रत्येक कार्य करावे आणि देवाला समर्पित करावे. 

या चार महिन्यात एका पाठोपाठ एक येणारे सण पाहता मुख्यत्वे पुढील देवांची पूजा केली जाते. 

१. श्रीहरी विष्णू 
२. माता लक्ष्मी
३. भगवान शिव 
४.  माता पार्वती आणि दुर्गा
५. हनुमान आणि मंगळ ग्रह 
६. सूर्यदेव
७. गणपती 
८. भगवान श्रीकृष्‍ण
९. श्रीराधा
१०.पितर  (पितृपक्ष)

या चतुर्मासात आषाढ महिन्यात भगवान विष्णू, सूर्यदेव, मंगलदेव, दुर्गा आणि हनुमान यांची पूजा केल्यास दुहेरी फळ मिळते. तसेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भगवान विष्णूची वामन रूपात पूजा केल्याने पुण्य मिळते. तसेच या पावसाळी ऋतूत पाऊस कमी नाही आणि जास्तही पडू नाही यासाठी जल देवतेचीही पूजा करतात. अशा रीतीने आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे चारही महिने व्रत वैकल्याने परिपूर्ण असतात आणि मानवाला सन्मार्गावर चालण्यास व आयुष्य उत्सवासारखे साजरे करण्यास प्रात्साहित करतात. 

Web Title: Shravan 2021 : Let's see which gods to worship in four months including Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.