Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:45 PM2022-07-22T16:45:10+5:302022-07-22T16:45:33+5:30

Shravan 2022: प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेल्या कोरोनाने लाखोंचे प्राण घेतले. या पार्श्वभूमीवर श्रावणात मांसाहार टाळणे का योग्य हे समजून घेणे हिताचे ठरेल! 

Shravan 2022: Do not eat meat from Shravan to Gauri-Ganpati; There are religious and scientific reasons behind it; Find out! | Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

googlenewsNext

>> मकरंद करंदीकर 

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात प्रत्येक प्रथेमागे विज्ञान सामावले आहे.  पूर्वी श्रावण मास सुरू झाल्यापासून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे होती. आजही अनेक घरांमधून या प्रथेचे पालन होते. तसे करणे एकार्थी आपल्याच हिताचे का आहे, कसे ते जाणून घेऊ. 

प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेल्या कोरोनाने लाखोंचे प्राण घेतले आहेत. अजूनही तो पूर्णतः गेलेला नाही. मंकी पॉक्सची नवीन टांगती तलवार आहेच. म्हणून निदान या पावसाळी दिवसांमध्ये तरी मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे या कारणांमुळे प्रकर्षाने अधोरेखित होते.

मांसाहार टाळण्याची वैज्ञानिक कारणे-

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार  नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 

३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 

५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा,  धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.  अशा सर्व कारणांमुळे या दिवसांना धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच-

१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 

२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 

३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              

४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. 

५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  

ही सर्व माहिती वाचून आपणही निश्चितच शाकाहाराची निवड कराल याची खात्री आहे. म्हणून 'श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा!'

Web Title: Shravan 2022: Do not eat meat from Shravan to Gauri-Ganpati; There are religious and scientific reasons behind it; Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.