Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 11:13 AM2023-08-19T11:13:01+5:302023-08-19T11:15:14+5:30

Shravan 2023: श्रावणात अनेक जण महिनाभर एकवेळ उपास करतात तर काही जण सण वारानिमित्त उपास करतात, पण उपास करताना दिलेले नियम पाळतात का? ते बघणं महत्त्वाचं!

Shravan 2023: Avoid 'these' mistakes while fasting in Shravan; Only then will you get the virtue of fasting! | Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

googlenewsNext

>> पं. हृषीकेश श्रीकांत वैद्य, धर्मसभा, राष्ट्रीय सचिव 

आज नवरात्री, एकादशी/ शिवरात्री/सोमवार/ चतुर्थी /शनिवार आहे , आज माझा उपास आहे ! असं आस्तिक लोक सर्रास म्हणतात. उपास हा शब्द शास्त्रात / वेदांत कुठे ही नाही. मग उपास म्हणजे नक्की काय? उपासाचा अर्थ काही खाऊ पिऊ नये हा आहे का? की कंद, फळं, दूध इ उपासाचे पदार्थ खावे - त्याला उपास म्हणतात; असा आहे ? असे प्रश्न अनेकांना पडतात. 

आस्तिक जनहो, खरंतर उपसाचं खाण्या-पिण्याच्या पदार्थांशी तसं फार काही विशेष देणं घेणं नाही. उपासाचे खरे देणे घेणे आहे ते देवाशी - परब्रह्माशी ! 
ते कसे काय? चला जाणून घेऊया 

उपास हा "उपवास" शब्दाचा अपभ्रंश आहे. उपवास (उप=जवळ, वास= सहवास) म्हणजे आपले शरीर, वाचा,  मन, बुद्धी व चित्त देवा समीप ठेवणे. उपवासाचा दिवस म्हणजे तहान भूक विसरून तन्मय होऊन देवाची भक्ती करत त्याच्याशी एकरूप होण्याचा दिवस. ज्याच्या सहवासाने आपण पापांपासून उपावृत्त(निवृत्त) होतो तो उपवास. 

उपवासाच्या दिवशी या नश्वर देहाला सांभाळण्यासाठी धान्य आदि निवडणे-टिपणे, चूल पेटवणे, रांधणे (जेवण बनवणे), भांडी घासणे, भांडी जागी लावणे, लादी पुसणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, केस- नखं कापणे, मेकअप करणे, चुगल्या करणे, इ. गोष्टींमध्ये वेळ ने घालवता विशिष्ट तिथी किंवा वारी फक्त कंद-मूळ, फळं - दूध इ सात्विक आहार घेऊन किंवा काहीही न खाता पिता तो सगळा वेळ देवाच्या आराधनेसाठी (नामस्मरण, भजन, पूजन, ध्यान, इ.) व्यतीत करावा. देहाचे शोषण करावे - हाच खरा उपवास!  मस्त तुपातले-दाणे-आलं-मिरची घालून चमचमीत पदार्थ बनवण्यात दिवस घालवणे हा काही उपवास नाही बरं !

किमान उपवासाच्या दिवशी विविध  इंद्रियांच्या विविध खाद्यावर नियंत्रण ठेवायला हवे. 
कानांनी काय ऐकावे-काय ऐकू नये 
मुखाने काय बोलावे -काय बोलू नये
डोळ्यांनी काय बघावे - काय बघू नये
नाकाने काय घ्राणावे - काय घ्राणू नये 
जिव्हेने कसला स्वाद घ्यावा- कसला घेऊ नये. 

सगळ्या इंद्रियांना देवाकडे केंद्रित करावे हाच खरा उपवास ! बृहदारण्यक उपनिषद, गौतम धर्मसूत्र, काठक गृह्यसूत्र व महाभारत या इतिहास ग्रंथात उपवास कसा व का करावा याची सविस्तर माहिती आहे. 

अनेकांना वाटतं की काही न खातापिता आपण आनंदाने देवाचे स्मरण कसे करू शकतो ? अहो, जर परमेश्वरा प्रति  भक्ती/प्रेम असेल, त्याला भेटण्याची ओढ असेल तर त्यापूढे तहान भूक नक्कीच विसरू शकतो. उदाहरण घ्या जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेपासून अत्यानंद प्राप्त होतो तेव्हा आपण तहान - भूक विसरून जातो ; दिवसभर न खाता पिता धावपळ करत राहू शकतो. तेव्हा अशक्तपणा ही येत नाही. तर जो आनंदकंद आहे तोच मिळणार आहे अशी दृढ श्रद्धा असेल तर तहान-भूक नाही का हरपणार ? 

वैज्ञानिक दृष्ट्याही महिन्यातून काही दिवस लंघन करणे हे शरीरासाठी उपयुक्त मानले गेले आहे. तर, उपास / उपवास म्हणजे नक्की काय याचा जुजबी अंदाज आता तुम्हाला नक्कीच आला असेल. 

संपर्क : 9323395598

Web Title: Shravan 2023: Avoid 'these' mistakes while fasting in Shravan; Only then will you get the virtue of fasting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.