Shravan 2024: 'या' गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा, शिवशंभो तुमच्यावर प्रसन्न आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:21 AM2024-07-29T11:21:57+5:302024-07-29T11:23:37+5:30
Shravan 2024: आज सोमवार आणि आगामी श्रावण मास, या मुहूर्तावर शिवकृपेचे संकेत जाणून घ्या!
आज सोमवार आणि येत्या सोमवारपासून अर्थात ५ ऑगस्ट पासून श्रावण मास (Shravan 2024) सुरू होत आहे. त्या संपूर्ण महिन्यात आपण शिव उपासना करणार आहोतच. पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे? ते पाहू.
देवाधिदेव महादेवाला आपण आशुतोष म्हणतो, कारण तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे. शिव भक्ती साधी सोपी आहे. महादेवाच्या आपल्या भक्तांकडून फार अपेक्षाही नाहीत. भक्त जे काही मनोभावे देतात त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात. त्यांची आपण उपासना करतो, पण त्यांची कृपा होत आहे की नाही ते ओळखण्याचे संकेत जाणून घेऊ.
अंतर्नाद :
शिवपुराणानुसार, जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतरंगात एक आवाज सतत निनादत राहतो. मानसिक रित्या ती व्यक्ती शांत असते. संकटातही डगमगत नाही की घाबरत नाही. अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिवकृपा प्राप्त होणे.
नंदीबैलाचे दर्शन :
जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजेच शांत बसलेला बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजण्यास हरकत नाही. अशा वेळी नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे जावे.
शिवाचे दर्शन :
जर स्वप्नात तुम्हाला शिवमंदिर दिसत असेल तर नक्कीच हे शुभ घटनांचे संकेत आहेत. शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर स्वार झालेली शिवमूर्ती किंवा शिव पार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे असे समजावे.